Brazil Viral News :नवी दिल्ली : काही वेळा काही घटना या निव्वळ धक्का देणाऱ्या असतात. ब्राझिलमधील (Brazil) एक सात वर्षाच्या मुलाची एक दु:खद घटना ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral news)होते आहे. ब्राझिलमध्ये एका सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू (7 Years old boy)झाला आहे. या चिमुरड्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरला आहे दक्षिण अमेरिकेतील सर्वात विषारी विंचू. या मुलाच्या बुटात हा विषारी विंचू लपलेला होता. विंचवाचा दंश झाल्याबरोबर या मुलाला एकापाठोपाठ एक असे एकूण सात ह्रदयविकाराचे झटके आले. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. (Seven year old boy died after 7 consecutive heart attack in viral story)
अधिक वाचा - Math Teacher Dance Video: बाईंचा डान्स पाहून गुरुजींना घालता येईना आवर, ठुमके पाहून फुटेल हसू
समोर आलेल्या वृत्तानुसार एनेम्बी, सो पाउलो राज्यातील लुईझ मिगुएल फुर्टाडो बार्बोसा 23 ऑक्टोबर रोजी आपल्या कुटुंबासह कॅम्पिंगला जाण्याच्या तयारीत असताना त्याच्या पायाला डंख मारला गेला. पुढील घटना सांगताना मुलाची आई अँजेलिटा प्रोएन्का फुर्ताडो यांनी सांगितले की, त्याने बूट घालण्याचा प्रयत्न करताच तो वेदनेने ओरडू लागला. त्याला कोणी दंश केला हे आम्हाला माहीत नाही. मात्र काही वेळातच त्याचा पाय लाल होऊ लागला आणि वेदना आणखी वाढल्या. त्यानंतरच मला समजले की हा दुसरा तिसरा कोणी नसून विंचवाने डंक मारला होता. त्यानंतर आम्ही हा विंचू कोणता आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला.
अँजेलिटा आणि तिचा नवरा एराल्डो बार्बोसा लगेच लुईझला युनिव्हर्सिटी ऑफ सो पाउलो फॅकल्टी ऑफ मेडिसिन क्लिनिक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे गेल्यावर त्याची, प्रकृती सुधारत असल्याचे दिसून आले. मुलाची आई म्हणाली, "डॉक्टरांनी त्यानंतर त्याला औषध देणेही बंद केले. त्यानंतर त्याने डोळे उघडले आणि माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मी त्याचे चुंबन घेतले आणि तो पुन्हा बेशुद्ध झाला.
अधिक वाचा - Police saved life: चालत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पोलिसाने वाचवलं मृत्यूच्या दाढेतून, पाहा VIDEO
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, त्यानंतर या मुलाला एकूण सात हृदयविकाराचा झटका आले. या गंभीर अवस्थेत दोन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या आईने पुढे सांगितले की, ही घटना घडली तेव्हा आम्ही कॅम्पिंगची तयारी करत होतो. त्यांचा मुलगा खूशीत होता. त्याला भरभरून जगायचे होते. जणूकाही त्याला एकाच दिवसात सगळ जगायचं होतं.
अधिक वाचा - Diabetes Control : ही 5 हिरवी पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहेत वरदान...पाहा जबरदस्त फायदे
स्थानिक पातळीवर नागरिक आणि अधिकाऱ्यांनी या दु:खद घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी या कुटुंबाला मानसिक आधार दिला आहे. त्या परिसरात या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यत विंचवाने डंख मारण्याच्या संबंधित एकूण 54 घटनांची नोंद झाल्याचे महापालिकेने सांगितले. सिटी हॉलने सांगितले की, "विंचूंचा समावेश असलेले अपघात दुर्मिळ नाहीत. कारण हे शहर टायट नदीच्या काठावर वसलेले आहे, इथे मोठे वनक्षेत्र आहे." दक्षिण अमेरिका हा एरवी घनदाट जंगल आणि भयानक प्राण्यांसाठी प्रसिद्धच आहे. दक्षिण अमेरिकेत जगातील अनेक सर्वाधिक विषारी जीव आढळतात. इथे जंगले इतकी घनदाट आहेत की तिथे अनेकदा जमिनीवर सूर्यप्रकाशदेखील पोचत नाही. अनेक शहरे आणि गावे या जंगलांच्या कडकडेनेच वसलेली आहेत. परिणामी येथील नागरिकांना अनेक धोक्यांचा सामना करावा लागतो.