Emotional Video: सात वर्षांच्या मुलीनं पहिल्यांदाच ऐकला आवाज, कानात मशीन लावताच डोळ्यात आले अश्रू

लहानपणी कानाचे पडदे फाटलेल्या सात वर्षाच्या मुलीने पहिल्यांदाच आवाज ऐकला आणि तिचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Emotional Video
सात वर्षाच्या मुलीनं पहिल्यांदाच ऐकला आवाज  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • मुलीने आयुष्यात पहिल्यांदाच ऐकला आवाज
  • वयाच्या सातव्या वर्षी ऐकला आवाज
  • आवाज ऐकताना डोळ्यातून तरळले अश्रू

Emotional Video: पंचेंद्रिये (Five senses) हा आपल्या जगण्याचा अमूल्य भाग आहेत. कान, नाक, डोळे, त्वचा आणि जिभ या प्रत्येक इंद्रियाचं ठराविक काम असतं आणि त्यातून आपल्याला जगाचा अनुभव घेता येतो. यातील एक इंद्रिय जरी निकामी झालं, तरी आयुष्यात अनेक अडथळे निर्माण होत असतात. कल्पना करा, जर आपल्याला जन्मापासून काहीच ऐकू येत नसतं, तर आपलं आयुष्य कसं झालं असतं? याच आयुष्यात वयाच्या सातव्या वर्षापर्यंत कधीही आवाज न ऐकलेल्या मुलाला अचानक ऐकू येऊ लागलं, तर त्याची अवस्था काय होईल,याची कल्पना करणंही फार अवघड आहे. अशा वेळी काय होऊ शकतं, याचा प्रत्यय नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओतून येतो. सध्या वैद्यकशास्त्राने केलेल्या प्रगतीचे वरदान एका मुलीला लाभले (Deaf Girl) आणि तिला चक्क ऐकायला येऊ लागलं. आयुष्यात पहिल्यांदाच आवाज ऐकू आल्यानंतर या मुलीच्या डोळ्यातून पाणी आलं. हा क्षण सर्वांनाच भावूक करून गेला. 

असं झालं ऑपरेशन

सध्या अनेक युजर्स इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ केनियातील असल्याची माहिती आहे. या मुलीचं नाव नेस्ताया असून ती सात वर्षांची आहे. जन्मापासूनच तिच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला होता. तिला ऐकायला येत नव्हतं. आजवर त्यासाठी कित्येक शस्त्रक्रियाही करण्यात आल्या होत्या. मात्र त्यापैकी कशाचाच उपयोग झााला नव्हता. जन्मानंतर काही दिवसांतच तिची तब्येत इतकी बिघडली की त्यात तिच्या कानाचे पडदे फाटले होते. त्यामुळे तिची ऐकण्याची क्षमता पूर्णतः नष्ट झाल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली. मात्र तिच्या आईवडिलांनी हार न मानता तिच्यावर उपचार करण्याची प्रक्रिया सुरु ठेवली होती. 

अधिक वाचा - Viral Video: मॅडमच्या शेजारी उभा राहून बोलू लागला कविता अन् तितक्यात निसटली पँट

मुलीसाठी खास यंत्र

तिच्या आईवडिलांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे डॉक्टरांनी या मुलीसाठी कानाचं मशीन तयार करण्याची प्रक्रिया काही महिन्यांपूर्वीच सुरु केली होती. मशीन तयार झाल्यानंतर मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना हॉस्पिटलमध्ये बोलावण्यात आलं. तिच्या कानाला डॉक्टरांनी हे मशीन लावलं आणि चक्क तिला ऐकू आलं. तिच्या कानाला मशीन लावल्यानंतर डॉक्टरांनी तिच्या पाठिमागून टाळी वाजवली आणि तिने त्या दिशेने वळून पाहिलं. मुलीला ऐकू येत असल्याचं त्यातून सिद्ध झालं आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. आपल्याला आयुष्यात पहिल्यांदा आवाज ऐकू आल्याची प्रतिक्रिया या चिमुकलीच्या चेहऱ्यावरही झळकली आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. आपल्या हातांनी अश्रू पुसताना ही मुलगी या व्हिडिओत दिसते आणि पाहणाऱ्या प्रत्येकालाचा आनंदाने भरून येतं. 

अधिक वाचा - Viral News : मटण खाऊन 22 वर्षीय तरुणी पडली 55 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, अनोखी लव्हस्टोरी बनली चर्चेचा विषय

व्हिडिओ होतोय व्हायरल

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहणारे अनेकजण हे मशीन तयार करून मुलीच्या आयुष्यात बदल घडवणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानत आहेत, तर या मुलीला भावी आयुष्यासाठी आशीर्वाद देत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी