Sex Dolls in stadium: रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षक दाखविण्यासाठी 'सेक्स डॉल' , मोठा वादंग 

Sex Dolls in football stadium: लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावात काही देशात क्रीडा स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहे. कोरियात फुटबॉल स्पर्धा सुरू झाल्या पण त्यामुळे मोठा वाद सुरू झाला आहे. 

sex dolls kept in empty spectators gallery as football begins in south korea sports news in marathi
Sex Dolls in stadium: रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षक दाखविण्यासाठी 'सेक्स डॉल' , मोठा वादंग   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • लॉकडाऊननंतर रिकाम्या स्टेडिअममध्ये फुटबॉल सामने सुरू
  • प्रेक्षक दाखविण्यासाठी ठेवण्यात आल्या सेक्स डॉल 
  • दक्षिण कोरियात फुटबॉल सामन्यानंतर झाला मोठा वाद 

सियोल :  सध्या कोरोनामुळे अनेक क्षेत्रात प्रभाव पडला आहे. आर्थिक स्थिती खराब तर झाली आहे. तर लोक भीतीच्या वातावरणात वावरत आहेत. आरोग्य सेवाची स्थिती दयनिय आहेत, तर जगभरातील क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. पण असे असताना जगातील काही भागात क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या आहे. पण त्या सुरू करताना अशी काही हातघाई केली जात आहेत त्यामुळे अनेक चुकीच्या आणि विचित्र गोष्टींचा वापर केला जात आहे. असा काहीास प्रकार दक्षिण कोरिया घतला आहे. या ठिकाणी सामना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळण्यात आला पण प्रेक्षकांच्या स्टॅंडमध्ये प्रेक्षक असल्याचे दर्शविण्यासाठी चक्क सेक्स डॉलचा वापर करण्यात आला. 

Sex dolls in Korean stadium

कोरियाची व्यावसायिक फुटबॉल लीग (के लीग) चा एक सामना खेळविण्यात आला. यावेळी सामन्यात प्रेक्षकांची उपस्थिती आहे आणि खेळाडूंचे मनोधर्य वाढविण्यासाठी चक्क सेक्स डॉलचा वापर करण्यात आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर के लीगच्या एफसी सियोलवर १० कोटी वोन म्हणेज (८१५०० ड़़ॉलर) चा दंड ठोठावण्यात आला आहे. १७ मे रोजी झालेल्या या सामन्यात आपल्या स्थानिक मैदानात प्रेक्षक दाखविण्यासाठी मानवीय पुतळे ठेवण्याची आयडीया सुचविण्यात आली. पण असे करताना मॅनिक्वीन ठेवण्या ऐवजी सेक्स डॉलचा वापर करणायात आला. 

Sex doll


२८ महिला आणि २ पुरूषांच पुतळे 

ही कल्पना सुचली तेव्हा कोणीही हरकत व्यक्त केली नाही. पण नंतर वादाला तोंड फुटले आहे.  हे पुतळे जेव्हा पाहण्यात आले तेव्हा समजले की हे मानवी पुतळे नसून सेक्स डॉल्स आहेत. यात एकूण ३० सेक्स डॉल ठेवण्यात आल्या होत्या यात २८ महिला पुतळे आणि २ पुरूषांचे पुतळे होते. या पुतळ्यांच्या हातात प्लेकार्ड देण्यात आले होते. हे पुतळे वेगवेगळ्या पोजमध्ये ठेवण्यात आले होते. पुतळ्यांच्या चेहऱ्यांवर मास्क लावला होता. 

Sex doll in South Korea football match

असे सहन केले जाणार नाही 

गोल डॉट कॉमने कोरिया लीगच्या हवाल्याने सांगितले की, शिस्त पालन समितीने या घटनेला गंभीरतेने घेतले आहे. तसेच शिस्त बंग केल्याने कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही खऱ्या सेक्स डॉल्समुळे ही कारवाई करण्यात आली . लीगने म्हटले की या प्रकारच्या कृतीने महिला प्रेक्षक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशा प्रकारची कृती सहन केली जाणार नाही. यापुढे अशी घटना घडू नये यासाठी क्लबवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

क्लबने सोशल मीडियावर मागिली माफी 

या सर्व प्रकाराबाबत सियोल क्लबने माफी मागितली आहे. एफसी सियोलने इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना म्हटले आम्ही फॅन्सची माफी मागतो. आम्ही या प्रकरणी खेद व्यक्त करतो. या कठीण प्रसंगी वातावरण हलके करण्याचा आमचा प्रयत्न होता. असा प्रकार पुन्हा करणार नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी