या ठिकाणी ' चपातीपेक्षा स्वस्त आहे सेक्स' पोट भरण्यासाठी तरुणी करतात शरिराची विक्री 

गरिबीचा सामना करणारे आफ्रिकन देश अंगोला आणि झिम्बाम्वे येथील स्थिती इतकी भयावह झाली आहे की तरूणींना एका चपातीच्या किंमतीपेक्षा कमी पैशात आपल्या शरिराचा सौदा करावा लागतो आहे. 

sex is cheap as bread in africa girls are selling sex to survive draught crisis viral news in marathi
या ठिकाणी ' चपातीपेक्षा स्वस्त आहे सेक्स' पोट भरण्यासाठी तरुणी करतात शरिराची विक्री   |  फोटो सौजन्य: Representative Image

लंडन :  आफ्रिकन देशांना देवाने अपार नैसर्गिक संपदा दिली आहे पण आजही येथे गरिबीने आपले हातपाय पसरलेले आहेत. गरीबी आणि भूकबळीची स्थिती अशी आहे की आफ्रिकन देशातील तरूणींनी एक चपातीच्या किंमतीपेक्षा कमी पैशात आपल्या शरिराचा सौदा करावा लागत आहे. अशा प्रकारच्या समस्यांचा सामना लाखों आफ्रिकन नागरीक करीत आहेत. 

चार दशकांच्या भयंकर दुष्काळामुळे अंगोलामध्ये एका १२ वर्षीय मुलीला आपल्या कुटुंबाचे भरणपोषण करण्यासाठी ४० सेंट म्हणजे ३० रुपयांपेक्षा कमी किंमतीला आपला देह विकावा लागत आहे. 

संयुक्त राष्ट्राच्या एका रिपोर्टनुसार सातत्याने पडत असलेल्या दुष्काळ, पूर आणि आर्थिक तंगीच्या विळख्यात सुमारे ४.५ कोटी लोक जगात राह आहेत. अन्नाच्या एकएका दाण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे. अशात झिम्बाब्वे आणि अंगोला सारख्या देशात १२ ते १७ वर्षीय तरूणींना जबरदस्तीने देहव्यापाराच्या धंद्यात ढकलण्यात येत आहे. जांबिया, मेडागास्कर, नामीबिया, लेसोथो आणि एस्वातिनी सारख्या देशातही अशा घटना खूप सामान्य आहे. 

रिपोर्टनुसार एका मुलीला सेक्सच्या बदल्यात एक डॉलर म्हणजे ७१ रुपये अत्यंत मुश्किलीने मिळतात. या पैशात ती एक किलो बीन्स किंवा दोन किलो मका खरेदी करू शकते. त्यामुळे घरच्यांच्या पोटाची खळगी भरता येतात. 

स्थिती दिवसेंदिवस इतकी भयावह होत आहे की यावर कोणताही उपाय समोर येत नाही आहे. गेल्या एका वर्षात सेक्स वर्कर म्हणून काम करणाऱ्या तरूणींची संख्या तब्बल दुप्पट झाली आहे. अशा तरुणींची संख्या किती आहे याचा निश्चित आकडा उपलब्ध नाही. 

या भयावह स्थितीमुळे मुलींचे शिक्षण बंद झाले आहे. पाण्याच्या शोधात जंगलात जातात त्यामुळे अंगोलामध्ये बलात्कार आणि बाल विवाहाच्या प्रकारात वाढ झाली आहे. लोक कमी वयात मुलींचे लग्न लावून देत आहेत. गरिबी झेलणआऱ्या एका कुटुंबाला एका व्यक्तीच्या पोट भरण्याचा जबाबादारीतून सुटका होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...