Black Taj Mahal: ताजमहल हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. ताजमहल पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक भारतात येत असतात. पांढऱ्या संगमरवरने बांधण्यात आलेल्या ताजमहालचं सौंदर्य पाहून सर्वच आश्चर्यचकित होतात. प्रत्येकाला ताजमहल पाहण्याची इच्छा असते. मात्र, याच ताजमहल समोर आणखी एक ताजमहल बांधण्यात येणार होता. इतकेच नाही तर हा ताजमहल काळ्या रंगाचा बनवण्यात येणार होता हे तुम्हाला माहिती आहे का? इतिहासात या काळ्या ताजमहलचा उल्लेख करण्यात आला आहे. (shah jahan wants to built black taj mahal but later drop this idea know the reason behind it)
काळ्या ताजमहलाच्या संदर्भात असं म्हटलं जातं की, जेव्हा आग्र्यात पांढऱ्या संगमरवरने ताजमहलचं बांधकाम करण्यात येत होतं तेव्हा मुघल सम्राट शाहजहां याने त्याच्या अगदी समोर आणखी एक ताजमहाल बनवण्याची योजना आखली होती. मात्र, शाहजहांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. यामागचे अनेक कारणं असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे पण वाचा : Pune: वीकेंड सेलिब्रेट करण्यासाठी पुण्याजवळील प्रसिद्ध ठिकाणे
या संदर्भात वेगवेगळ्या इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. उत्तरप्रदेश सरकारच्या वेबसाईटनुसार, शाहजहां याला काळ्या संगमरवरने आणखी एक ताजमहाल बनवण्याची इच्छा होती. हा काळा ताजमहाल खूप भव्य बनवण्यात येणार होता. सध्या असलेल्या ताजमहल प्रमाणेच काळा ताजमहल बांधण्यात येणार होता आणि त्याची डिझाईन अगदी सारखीच होती.
हे पण वाचा : कोणत्या राशीची व्यक्ती कशी झोपते? तुमची रास कोणती?
काळा ताजमहाल यमुना नदीच्या किनाऱ्यावर म्हणजेच माहताब बाग येथे बांधण्यात येणार होता. एका रिपोर्टनुसार, पांढऱ्या ताजमहालमध्ये शाहजहां यांची बेगम मुमताजची कब्र बनवण्यात आली तर काळ्या ताजमहालमध्ये शाहजहां स्वत:चा मकबरा बनवू इच्छित होता. मात्र, त्याचं हे स्वप्न अपूर्ण राहीलं. कारण, मुलगा औरंगजेबसोबत त्याचा वाद सुरू झाला होता. औरंगजेबने वडील शाहजहांला कारागृहात टाकले होते. याचा उल्लेख यूरोपियन लेखक 'जेन-बैप्टाइज टेवरनियर' ने केला होता. ते 1665 मध्ये आग्रा येथे आले होते.