शिखर धवनची भूतदया, प्राण्यांना खाऊ घालतोय फळं

Shikhar Dhawan And His Son Zoravar Feeding Animals भारताचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन सध्या क्रिकेटमुळे नाही तर त्याच्या भूतदयेमुळे चर्चेत आहे.

Shikhar Dhawan And His Son Zoravar Feeding Animals
शिखर धवनची भूतदया, प्राण्यांना खाऊ घालतोय फळं 

थोडं पण कामाचं

  • शिखर धवनची भूतदया, प्राण्यांना खाऊ घालतोय फळं
  • शिखर आणि त्याच्या मुलाचा ५९ सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल
  • कोरोना ब्रेकचा शिखरने घरच्यांना वेळ देऊन केला व्यवस्थित उपयोग

नवी दिल्ली: भारताचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) सध्या क्रिकेटमुळे नाही तर त्याच्या भूतदयेमुळे चर्चेत आहे. शिखर त्याच्या मुलाला, झोरावरला (Zoravar) सोबत घेऊन ठिकठिकाणी फिरुन भुकेल्या प्राण्यांना फळं खाऊ घालत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Shikhar Dhawan And His Son Zoravar Feeding Animals)

शिखर आणि त्याच्या मुलाचा ५९ सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल

शिखर स्वतःची कार ड्राइव्ह करत घरापासून जवळ असलेल्या मोकळ्या परिसरात जात आहे. मास्क घालण्याची खबरदारी घेऊन शिखर आणि त्याचा मुलगा कारमधून बाहेर पडून परिसरातल्या प्राण्यांना फळं देत असल्याचा एक व्हिडीओ चर्चेत आहे. या ५९ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये दोघेही प्रेमाने प्राण्यांना खाऊ घालताना दिसत आहेत. याआधीही शिखरने अशा प्रकारे प्राण्यांना फळं खाऊ घातली आहेत. मात्र यावेळी व्हिडीओ आल्यामुळे शिखरच्या भूतदयेची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. 

व्हिडीओमध्ये शिखर आणि झोरावर गायींना तसेच माकडांना प्रेमाने फळं खाऊ घालताना दिसत आहेत. कोरोना संकटामुळे प्राण्यांना अन्न देणे कमी झाले आहे. जो तो आपापल्या घरात थांबून स्वतःचा आणि कुटुंबाचा प्राधान्याने विचार करत आहे. त्यामुळे गल्लीबोळांतून फिरणाऱ्या प्राण्यांची पंचाईत झाली आहे. या उपाशी प्राण्यांना बोलता येत नसल्यामुळे त्यांची अडचण कोणालाही सांगता येत नाही. प्राण्यांचे हाल होत आहेत. त्यांचा हा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने शिखरने प्राण्यांना खाऊ घालण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

प्राण्यांना खाऊ घातल्यावर खूप आनंद वाटतो, मनाचे समाधान होते असे शिखरचे म्हणणे आहे. मुलावर भूतदयेचा संस्कार करण्यासाठी त्याला सोबत घेऊन फिरत आहे, त्याच्या हातून प्राण्यांना खाऊ घालत असल्याचे शिखरने सांगितले. 

सुरुवातीला झोरावर प्राण्यांना बघून घाबरला. मात्र वडील सोबत असल्याचे बघून त्याने हिंमत केली आणि वडिलांच्या सूचनेचे पालन करत प्राण्यांना खाऊ घातले. थोड्याच वेळात त्याला या प्रकारात गंमत वाटू लागली. नंतर तो सहजतेने प्राण्यांना खाऊ घालू लागला. 

शिखर धवन आणि झोरावर यांचा प्राण्यांना फळं खाऊ घालतानाचा ५९ सेकंदांचा व्हिडीओ बघून अनेकांनी दोघांचे कौतुक केले आहे. प्राण्यांना फळं खाऊ घालण्याच्या उपक्रमामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना आनंद वाटतोय आणि तेच महत्त्वाचे असल्याचे शिखरने सांगितले. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

शिखरचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल

याआधी शिखरचा पत्नीला खूष करण्यासाठी मुलासोबत केलेला डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कोरोनामुळे क्रिकेट थांबले आहे. या ब्रेकचा शिखरने घरच्यांना भरपूर वेळ देऊन व्यवस्थित उपयोग करुन घेतला. शिखरने तो दिवस कसा घालवतो हे सांगणारे निवडक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. शिखरने इन्स्टा केलेले इन्स्टाग्रामवरील व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहेत. शिखरच्या प्रत्येक व्हिडीओला हजारो चाहते बघत आहेत. त्याच्या व्हिडीओंना भरपूर प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण त्याच्या उपक्रमांचे कौतुक करत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

क्रिकेटपटूंना मोठी सुटी मिळणार की आयपीएल होणार?

दरम्यान, आयसीसीने टी-२० वर्ल्ड कप २०२० ऐवजी ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ मध्ये होईल असे जाहीर केले आहे. याआधी एशिया कप क्रिकेट स्पर्धा होणार नसल्याची माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली होती. त्यामुळे बीसीसीआय आयपीएल संदर्भात काय निर्णय घेणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. आयपीएल पुढे ढकलली गेली तर भारतीय क्रिकेटपटूंना आणखी काही महिन्यांची मोठी सुटी एन्जॉय करत घरी बसावे लागणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी