शिवसेनेला 'या' ११८ जागा मिळणार?, ही यादी होतेय व्हायरल 

व्हायरल झालं जी
Updated Sep 30, 2019 | 23:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

शिवसेना आणि भाजपची युती निश्चित झाल्यानंतर शिवसेनेला कोणत्या जागा मिळाल्या आहेत याची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

shiv sena will get these 118 seats this list goes viral
शिवसेनेला 'या' ११८ जागा मिळणार?, ही यादी होतेय व्हायरल   |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • शिवसेनेला मिळणाऱ्या जागांची यादी होतेय व्हायरल 
  • शिवसेना-भाजपच्या युतीवर अखेर शिक्कामोर्तब
  • शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळणार?

मुंबई: शिवसेना आणि भाजपच्या युतीची घोषणा अखेर आज (सोमवार) करण्यात आला. यावेळी एक संयुक्त पत्रक काढून युतीची घोषणा करण्यात आली. पण या पत्रकात युतीच्या कोणत्याही फॉर्म्युल्याची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे युती जरी जाहीर केलेली असली तरी फॉर्म्युल्याचा सस्पेंस मात्र कायम आहे. त्यामुळे कुणाला किती जागा मिळणार याबाबत अद्यापही तर्क-वितर्कच लढवण्यात येत आहे. पण असं असलं तरीही आतापासूनच कुणाला किती जागा मिळणार आणि कोणते मतदार संघ याची एक यादीच सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. 

सोशल मीडियावर सध्या शिवसेनेला किती जागा मिळणार आणि कोणते मतदार संघ याची यादी व्हायरल होत आहे. पाहा व्हायरल होणारी नेमकी यादी आहे तरी काय... 

व्हायरल होणारी यादी: 

जागा वाटप शिवसेना जागा 1) वरळी 2)अणुशक्तीनगर 3) धारावी 4)परळ 5)दादर 6) कलिना 7)कुर्ला 8)वांद्रे पूर्व 9) जोगेश्वरी 10)अंधेरी पूर्व 11)दहिसर 12) विक्रोळी 13)भांडुप 14) मागठाणे 15)दिंडोशी 16) मानखुर्द 17)मालाड 18)मुंबादेवी 19)कोपरी पाचपाखाडी  20)अंबरनाथ 21)शहापूर 22) भिवंडी पूर्व 23)भिवंडी ग्रामीण 24)कल्याण ग्रामीण 25)पालघर 26)नालासोपारा 27)उल्हासनगर 28) ऐरोली 29)मुंब्रा /बेलापूर 30)ठाणे शहर /विक्रमगड 31)उरण 32)श्रीवर्धन 33)कर्जत खालापूर 34)अलिबाग 35)महाड 36) दापोली 37)चिपळूण 38)गुहागर 39)रत्नागिरी 40)राजापूर 41)कुडाळ 42)सावंतवाडी 43)इगतपुरी 44)नांदगाव 45)निफाड 46)मालेगाव आऊटर 47)दिंडोरी 48)येवला 49)देवलाली 50)धुळे ग्रामीण 51)पाचोरा 52)चोपडा 53)जळगाव ग्रामीण 54)एरंडोल 55)औरंगाबाद मध्य 56)औरंगाबाद वेस्ट 57)कन्नड 58)वैजापूर 59)पैठण 60)सिल्लोड 61)जालना शहर 62)घनसावंगी 63)नांदेड दक्षिण 64)हदगाव 65)देगलूर 66)लोहा कंधार 67)परभणी शहर 68)उस्मानाबाद 69)भूम परांडा 70)उमरगा 71)लातूर शहर 72)बुलढाणा 73)मेहकर 74)चिखली 75)वरोरा 76)दिग्रस 77)खेड 78)जुन्नर 79)आंबेगाव 80)पुरंदर 81)भोर 82)बारामती 83)वडगाव शेरी /हडपसर 84)पिंपरी 85)भोसरी /कोथरूड 86)बार्शी 87)माढा 88)करमाळा 89)सोलापूर मध्य 90)पाटण 91)कोरेगाव 92)वाई 93)आटपाडी 94)कोल्हापूर उत्तर 95)कागल 96)शाहूवाडी 97)करवीर 98)राधानगरी 99)वडगाव 100)शिरोळ 101)चंदगड 102)पाथरी 103)देवळी 104)कळमनुरी 105)बीड 106)हिंगणघाट    107)हिंगणा 108)वसमत 109)भोकर  110)अहमदपूर 111)औसा 112)पारनेर 113)अहमदनगर शहर 114)अकोले 115)श्रीरामपूर 116)संगमणेर 117)सिंदखेड राजा 118)ओवळा माजिवडा

ही यादी फक्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण असं असलं तरी ज्या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत त्या ठिकाणच्या जागा या तेच पक्ष लढवत हे जवळपास निश्चित समजलं जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी