[Video] भारताचा उसैन बोल्ट'चा व्हिडिओ व्हायरल, शिवराजने शेअर केला तर मदतीला आले रिजिजू 

व्हायरल झालं जी
Updated Aug 19, 2019 | 15:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

रामेश्वर गुर्जर एक शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. रामेश्वरबाबत खास गोष्ट म्हणजे तो १०० मीटर अंतर केवळ ११ सेंकदात पूर्ण करतो. शिवराज सिंह यांनी रामेश्वरसाठी ट्वीट करून क्रीडा मंत्र्यांकडे मदत मागितली.

rameshwar gurajar
भारताचा 'उसैन बोल्ट' रामेश्वर गुर्जर   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • १०० मीटर रेस ११ सेकंदात पूर्ण करतो रामेश्वर गुर्जर 
  • मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ट्विट करून रामेश्वरसाठी मदत मागितली 
  • क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांना केली विनंती आणि केली मदतीचा मागणी 
  • किरेन रिजिजू म्हणाले की या युवा अॅथलिटला अकादमीत दाखल करणार 

भोपाळ :  नशीबाचा खेळही अजब आहे. देशात आज अनेक प्रतिभावंत खेळाडू संसाधनांच्या अभावी फुलण्यापूर्वीच कोमेजून जात आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती त्यांच्या स्वप्नांच्या पंखांना उड्डाण घेण्यापूर्वीच रोखते. काही अशी काहणी समोर आली मध्य प्रदेशमधून येथील १९ वर्षी तुरूणाने १०० मीटरची रेस ११ सेकंदात पूर्ण केली. 

रामेश्वर गुर्जर असे या युवा धावपट्टूचे नाव असून त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिराज सिंह चौहान यांनी शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करताना शिवराज सिंह यांना या तरूणाला मदत करण्याचे आवाहन केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांना त्याला मदत करण्याची विनंती केली. 

भाजप नेता शिवराज सिंह चौहान यांनी लिहिले की. भारताला प्रतिभावंत व्यक्तींचा आशीर्वाद प्राप्त आहे. योग्य संधी आणि योग्य व्यासपीठ मिळाला तर ते इतिहास निर्माण करू शकतात. यासोबत शिवराज सिंह यांनी क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांना हा व्हिडिओ टॅक करताना लिहिले की, तुम्हांला विनंती आहे या महत्त्वाकांक्षी एथलीटच्या कौशल्याला पुढे वाढविण्यासाठी त्याला पाठिंबा द्या. 

 

 

शिवराज सिंह यांच्या ट्विटला उत्तर देताना किरेन रिजिजू यांनी म्हटले की, शिवराज सिंह जी कृपया कोणाशी तरी बोलून त्याला माझ्याकडे पाठवा. मी त्याला एका अॅथलेटीक अकादमी ठेवण्याची व्यवस्था करेल. शिवराज सिंह चौहान यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यावर तो खूप जलद व्हायरल झाला. या व्हिडिओला आतापर्यंत १ लाख ६० हजार लोकांना पाहिले आहे. 

एका रिपोर्टनुसार, रामेश्वर गुर्जर हा मध्यप्रदेशचा शिवपुरी जिल्ह्यात राहणारा आहे. तो एका शेतकरी कुटुंबातील आहे. विशेष म्हणजे रामेश्वर याने आपली धाव ही अनवाणी पायाने पूर्ण केली आहे. दुसरीकडे मध्यप्रदेशचे क्रीडा मंत्री जीतू पटवारीने सांगितले की, या युवा खेळाडूला योग्य ती ट्रेनिंग आणि सुविधा दिली तर तो १०० मीटरची रेस ९ सेंकदात पूर्ण होईल, असा मोठा दावा केला आहे. 

 


माहितीनुसार, रामेश्वर यांना मध्यप्रदेश सरकारकडून राजधानी भोपाळमध्ये बोलवण्यात आले. जगात सर्वात जलद १०० मीटर रेस धावण्याचा विक्रम उसैन बोल्ट यांच्या नावावर आहे. उसैन बोल्ट याने १०० मीटर रेस ९.५८ सेकंदात पूर्ण करून विक्रम प्रस्थापित केला आहे. 

 

शिवराज सिंह चौहान यांनी अशा प्रकारे आपले मोठेपण दाखवले आहे. शुक्रवारी शिवराज सिंह चौहान यांचा ताफा भोपाळ-जैत रोडवरून जात होता. त्या वेळी भाजप नेत्याला जखमी अवस्थेत एक व्यक्ती दिसला. जखमी युवकाला पाहून त्यांनी आपला ताफा रोखला आणि त्याची मदत केली. त्याला अॅम्बुलन्सपर्यंत पोहचवण्यास मदत केली. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...