नवी दिल्ली : सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, हे पाहून तुम्हाला एका क्षणासाठी भीती वाटेल. व्हिडिओमध्ये असे दिसते की एका गल्लीमध्ये पार्क केलेली बाईक आपोआप सुरू झाली. ट्विटर यूजर अबार जैदी यांनी 30 सेकंदाची क्लिप पोस्ट केली असून सोशल मीडिया युजर्स ही क्लिप पाहिल्यानंतर आश्चर्यचकित होत आहे आणि कमेंट करीत आहेत. एका युजरने लिहिले, 'हे खरोखर अविश्वसनीय आहे, खरोखर भूत असतात काय?'
अंबर जैदी यांनी व्हिडिओ ट्विट करुन लिहिले आहे की, "कॅमेऱ्यात कैद झाले आहे नाही तर कोणी विश्वास ठेवला नसता." मीडिया रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ गुजरातचा आहे, जेथे रात्री सामसुम रस्त्यात उभ्या असलेल्या दुचाकीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. क्लिपमध्ये पाहिल्याप्रमाणे घराच्या समोरून रस्त्यावर दोन दुचाकी उभ्या होत्या. मग अचानक एक बाईक स्वत: हून चालू लागली. त्यानंतर वळताना खाली पडते.
आतापर्यंत अडीच हजार लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे आणि मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत आणि टिप्पण्या देत आहेत. एका युजरने प्रश्न विचारला, लिहिले, 'जेव्हा पडलेली गाडी उचलली असती तेव्हा मला विश्वास बसला असता की भूत खरे आहेत.' त्याच वेळी एका युजरने लिहिले, 'मॅडमजी, भुताला कदाचित गडकरीचे ड्रायव्हिंग चुकांचे दंडाचे दर आठवले असतील आणि गाडी सोडून पळून गेला असता.'