श्रावणात 'या' गावातील महिला पाच दिवस परिधान करत नाहीत कपडे, काय आहे अजब प्रथा अन् कारण?

tradition about non wearing cloths: भारतात अनेक राज्यांत विविध प्रकारच्या परंपरा आहेत. काही परंपरा अशा आहेत ज्या ऐकल्यावर आश्चर्याचा धक्काच बसतो. अशीच एक परंपरा आहे ज्यात महिला पाच दिवस कपडे परिधान करत नाहीत.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो (Photo: People) 
थोडं पण कामाचं
  • हिमाचल प्रदेशातील गावात अनोखी परंपरा
  • श्रावण महिन्यात ही विचित्र आणि अजब प्रथा होते
  • या प्रथेनुसार महिला पाच दिवस कपड्यांशिवाय राहतात

Shocking tradition: आपण २१व्या शतकात असलो तरी सुद्धा आजही भारतात आणि या जगात अशा अनेक परंपरा आहेत ज्या ऐकल्यावर आश्चर्याचा धक्काच बसतो. आज आम्ही तुम्हाला ज्या परंपरेबद्दल सांगणार आहोत ते ऐकल्यावर तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल. हिमाचल प्रदेशात ही परंपरा पार पडली जाते. या परंपरेनुसार, महिला वर्षातून पाच दिवस कपड्यांशिवाय राहतात म्हणजेच या काळात त्या कपडे परिधान करत नाहीत. (shocking tradition here women never were cloths for five days in shravan month know about tradition)

हिमाचल प्रदेशातील अनोखी परंपरा

हिमाचल प्रदेशातील मणिकर्ण खोऱ्यातील पिनी गावात ही विचित्र परंपरा सुरू आहे. श्रावण महिन्यात ही परंपरा सुरू होते. या गावातील ग्रामस्थांचा विश्वास आहे की, या परंपरेनुसार ज्या दिवशी ही परंपरा राबवली जाते त्या पाच दिवसांत महिलांनी कपडे परिधान केले तर त्यांच्यासोबत अशुभ होते. यासोबतच काहीतरी अप्रिय वृत्त किंवा एखाद्याच्या मृत्यूची घटना सुद्धा घडू शकते. त्यामुळेच या गावातील ग्रामस्थ वर्षानुवर्षे या परंपरेचं पालन करताना दिसून येत आहेत.

अधिक वाचा : Deathpool:  या स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेल्यावर जातो जीव, नव्या जलाशयाच्या शोधामुळे उलगडतील अनेक रहस्यं

या परंपरेच्या मागचे एक कथा आहे. गावातील लोक सांगतात की, येथे शतकांपूर्वी एक राक्षस राहत होता. तो गावात यायचा आणि सुंदर कपडे परिधान केलेल्या महिलांना उचलून घेऊन जात असे. या राक्षसाचा वध लहुआ नावाच्या देवताने केला होता. गावातील लोक मानतात की, आझही गावात लहुआ देवता येतात आणि गावातील दुष्टांसोबत लढतात. यामुळेच गावातील ग्रामस्थ आजही ही परंपरा पाळतात. या पाच दिवसांत गावात मांसाहार आणि दारूचे सेवन पूर्णपणे बंद असते.

स्त्रिया समाजातून वेगळ्या राहतात

या ५ दिवसात महिला स्वत:ला समाजापासून पूर्णपणे वेगळ्या ठेवतात. यासोबतच पाच दिवस कुठल्याही प्रकारचा उत्सव, कार्यक्रम होत नाही. इतकेच नाही तर या पाच दिवसांच्या काळात हसण्यावरही बंदी असते. मात्र, कालांतराने या परंपरेत काही बदल झाले आहेत. जिथे पूर्वी स्त्रिया परंपरा पाळण्यासाठी पाच दिवस कपड्यांशिवाय राहत होत्या त्याचवेळी आता त्या खूप पातळ कपडे घालतात आणि हे कपडे बदलत नाहीत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी