Shocking Video: पिंजऱ्यातील सिंहासोबत मस्ती, जंगलातील राजाच्या जबड्यात बोट घालणं पडलं महागात, सुदैवानं वाचला हात

वाघ, सिंह किंवा इतर हिंसक प्राणी पिंजऱ्यात असली म्हणजे ते आपला चपळपणा विसरले असतील असे नाही. यामुळे प्राणीसंग्रहालयात फिरत असाल तर सिंह वाघांशी दोन हात लांब राहिलेलं बरं. अनेकवेळा लोकं प्राणी संग्रहालयात फिरताना प्राण्याशी मस्ती करत असतात मग डोक्याला हात लावत पश्चाताप करत बसावं लागतं. दरम्यान जमायका प्राणीसंग्रहालयातील अशाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Shocking Video
पिंजऱ्यातील सिंहासोबत मस्ती, हाताची सर्वच बोटं गेली असती  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • थरकाप उडवणारा हा व्हिडिओ जमायकाच्या प्राणीसंग्रहालयातील आहे.
  • @OneciaG नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून एका यूजरने हा भयानक व्हिडिओ ट्विट केला आहे.
  • सिंहाच्या जबड्यात बोट घालणं व्यक्तीला पडलं महागात.

नवी दिल्ली :  वाघ, सिंह किंवा इतर हिंसक प्राणी पिंजऱ्यात असली म्हणजे ते आपला चपळपणा विसरले असतील असे नाही. यामुळे प्राणीसंग्रहालयात फिरत असाल तर सिंह वाघांशी दोन हात लांब राहिलेलं बरं. अनेकवेळा लोकं प्राणी संग्रहालयात फिरताना प्राण्याशी मस्ती करत असतात मग डोक्याला हात लावत पश्चाताप करत बसावं लागतं. दरम्यान जमायका प्राणीसंग्रहालयातील अशाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यातील एक व्यक्तीला सिंहासोबत मस्ती करणं चांगलचं महागात पडलं आहे. सुदैवाने जंगलाच्या राजाने जबड्याची पकड सैल केल्यामुळे या व्यक्तीचा हात वाचला. 

दरम्यान, थरकाप उडवणारा हा व्हिडिओ जमायकाच्या प्राणीसंग्रहालयातील आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दिसत आहे, जो इथे फिरण्यासाठी आला असावा. सर्वजण सिंहासोबत त्याचे फोटो घेत आहेत आणि व्हिडिओ बनवत आहेत. मात्र हा व्यक्ती सिंहाला हात लावून त्याच्याशी खेळत होता. परंतु जंगलाचे राजा मस्ती करण्याच्या मनस्थितीत नव्हते. कधी गालाला तर कधी नाकाल तर कधी तोंडात बोटं घालत होता, हे काही सिंहाला आवडलं नाही मग यानंतर या व्यक्तीसोबत जे काही घडलं, ते एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हतं.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती सिंहाच्या पिंजऱ्याबाहेर उभा असल्याचं दिसतं आणि पिंजऱ्याच्या आतून सिंह त्याला पाहत आहे. सिंहाला इतक्या जवळून पाहूनही या व्यक्तीचं समाधान होत नाही आणि तो पिंजऱ्याच्या आतमध्ये बोटं घालून सिंहासोबत खेळू लागतो. ही गोष्टी जंगलाच्या राजाला अजिबातही आवडत नाही. सुरुवातीला तो काहीच करत नाही, पण थोड्या वेळाने रागावलेला सिंह या व्यक्तीची बोटं आपल्या जबड्यात पकडतो. यानंतर मात्र या व्यक्तीला घामच फुटतो. खूप प्रयत्नानंतर तो आपला हात सिंहाच्या जबड्यातून बाहेर काढण्याच यशस्वी ठरतो. मात्र यात त्याच्या हाताच्या बोटाची हाडंच वाचली आणि मांस सिंहाने ओढून खाल्लं.

@OneciaG नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून एका यूजरने हा भयानक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्याने व्हिडिओसोबत जमायकन म्हणही लिहिली आहे. यात त्याने म्हटलं की, दिखावा करण्याच्या नादात अपमानच होतो. हा व्हिडिओ शेअर करण्यात आल्यापासून आतापर्यंत 3.6 मिलियनहून जास्त लोकांना पाहिला आहे. यावर हजारो लोकांनी कमेंट करत या व्यक्तीच्या मूर्खपणावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी