Shocking Accident : बंदूकधारी बाईकस्वारांची कारचालकाला धमकी, काही क्षणांत मिळाली शिक्षा, पाहा VIDEO

आपल्याला बंदूक दाखवून धमकी देणाऱ्या आणि पाठलाग करु पाहणाऱ्या बाईकस्वारांना कारचालकाने चांगलाच धडा शिकवला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Shocking Accident
बंदूक घेऊन धमकावणाऱ्यांना मिळाली शिक्षा, पाहा VIDEO  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • बाईकस्वारांकडून बंदूक दाखवत कारचालकाला धमकी
  • कारचालकाने दिली जोरदार धडक
  • व्हिडिओ होतोय व्हायरल

Shocking Accident : सोशल मीडियावर (Social Media) दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. त्यातील काही व्हिडिओ हे विनोदी असतात, काही व्हिडिओ हे गंभीर असतात तर काही व्हिडिओ हे प्रेरणादायी असतात. आयुष्याचं तत्त्वज्ञान मांडणारे काही व्हिडिओही सोशल मीडियावर पाहायला मिळतात तर केवळ टाईमपास करणारे आणि क्षणिक हास्य फुलवणारे काही व्हिडिओदेखील अपलोड होत असतात. प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार असे व्हिडिओ पाहत असतो आणि त्याला प्रतिसाद देत असतो. यापैकी आयुष्यात मांडण्यात येणाऱ्या काही तत्त्वज्ञानाला दुजोरा देणारे काही व्हिडिओदेखील व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून आपल्या कर्माचं फळ लगेच कसं मिळतं, याची चर्चा त्यातून सुरू झाली आहे. 

बाईकवरून आले बंदूकस्वार

या व्हिडिओत एका रस्त्यावर उभी असलेली पांढरी कार दिसते. या कारमध्ये अगोदरपासून एकजण ड्रायव्हिंग सीटवर बसला आहे. तेवढ्यात रस्त्याने एका बाईकवरून दोघे येताना दिसतात. दोघांपैकी बाईकवर मागे बसलेली व्यक्ती हातात बंदूक घेऊन आक्रमक पवित्र्यात खाली उतरते. बाईक चालवणारा इसमही बाईक अचानक कारच्या समोर आणून उभा करतो. दोघंही बाईकवरून उतरतात आणि कारच्या दिशेनं जातात. एकजण कारच्या उजव्या बाजूला जातो तर दुसरा डाव्या बाजूला जातो. आपल्या हातातील बंदूक दाखवून कारचालकाला धमकावण्याचा प्रयत्न ते करत असल्याचं दिसतं. 

कारचालकाने दिल्या हातावर तुरी

दे दोघं कारचालकाला धमकावण्याचा प्रयत्न करत असताना आणि आपल्या बंदुकीचा निशाणा त्याच्यावर लावण्याचा प्रयत्न करत असताना अचानक ही कार सुरू होते आणि निघून जाते. त्यामुळे अधिकच संतापलेले दोघे बाईकस्वार त्याचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतात आणि पुन्हा बाईकवर बसतात. बाईकला किक मारून बाईक कारच्या दिशेने वळवणार तेवढ्यात चमत्कार होतो आणि दोन्ही बाईकस्वारांना जबर धक्का बसतो. 

अधिक वाचा - Viral Video : सौदी अरेबियाच्या गायकाने गायले 'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा', व्हिडिओने इंटरनेटवर घातला धुमाकूळ

कारवाल्याने उडवले

काही अंतर पुढे गेलेला कारचालक कार रिव्हर्स गिअरमध्ये टाकून वेगाने मागे आणतो. बाईक वळवण्याच्या नादात आणि त्याच्यावर हल्ला करण्याच्या नादात असणाऱ्या बाईकस्वारांना हा धक्का असतो. कार जोरदारपणे मागे येऊन बाईकवर आदळते. यात बाईकला जोरदार धक्का बसतो आणि ती खाली पडते. त्याच्यावर बसलेले दोघेही खाली पडतात आणि जिवाच्या आकांताने धावत जातात. कसाबसा आपला जीव वाचवत घाबरलेले बाईकस्वार तिथून निघून जातात. 

अधिक वाचा - "मच गया शोर..." वर मुंबई पोलिसांनी धरला ताल, Video व्हायरल

व्हिडिओ होतोय व्हायरल

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आपल्या कर्माची शिक्षा मिळते, असं म्हटलं जातं. मात्र ती इतक्या लवकर मिळते, हे माहित नव्हतं, अशी कमेंट एका युजरने या व्हिडिओवर दिली आहे. तर दुसऱ्या एकानं कारवाल्याच्या कृतीचं समर्थन केलं आहे. त्याच्या जिवाला धोका असल्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी कारचालकाने जे केले ते योग्यच केले, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी