Shocking Video: 7 ते 8 भटके कुत्रे दोन चिमुकल्यांच्या मागे लागले आणि मग...; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Stray dogs chase two childrens: गेल्या काही दिवसांपासून कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. 

shocking video stray dogs attempt to attack on two children cctv footage viral watch it
Shocking Video: 7 ते 8 भटके कुत्रे दोन चिमुकल्यांच्या मागे लागले आणि मग...  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • भटक्या कुत्र्यांची टोळी चिमुकल्यांच्या मागे लागली
  • संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
  • अंगावर काटा आणणारा व्हिडिओ होतोय व्हायरल

Stray dogs attempt to attack on students: काही दिवसांपूर्वी पनवेल येथून एक व्हिडिओ समोर आला होता. एका झोमॅटो बॉयवर लिफ्टमधून बाहेर पडताना कुत्रा हल्ला करतो. त्यानंतर अशाच घटना नोएडा आणि गाझियाबादमध्ये घडल्याच्या समोर आल्या होत्या. त्यानंतर आता आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना केरळमधील कन्नूर येथील आहे. (shocking video stray dogs attempt to attack on two children cctv footage viral watch it)

एका रस्त्यावरुन जाणाऱ्या दोन चिमुकल्यांच्या मागे सात ते आठ कुत्रे लागतात. आपल्या मागे कुत्रे धावत येत असल्याचं पाहून आपला जीव वाचवण्यासाठी ही दोन्ही मुलं पळू लागली. जोरजोरात धावत ही मुले कशीबशी घराच्या मुख्य दरवाजातून आतमध्ये प्रवेश करतात. त्यानंतर लगेचच ते दरवाजा लावतात.

हे पण वाचा : म्हणून पुरुषांचा नात्यातील रस होतो कमी​

दरवाजा लावल्याने कुत्रे बाहेरच थांबतात आणि परिणामी त्यांना पुन्हा जावे लागते. वेळीच या मुलांनी घराच्या आवारात प्रवेश केल्याने बचावले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

हे पण वाचा : म्हणून 'या' लोकांनाच मच्छर जास्त चावतात

कुत्र्याचा सायकलस्वारावर हल्ला

कोझिकोड येथील एका गवात भटक्या कुत्र्याने एका सायकरवरुन जाणाऱ्या मुलावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सुद्धा कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 51 सेकंदांचा आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, एक मुलगा सायकल चालवत होता आणि तितक्यात भटका कुत्रा त्याच्यावर हल्ला करतो.

या भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात हा सायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. या मुलाच्या हातावर आणि इतर ठिकाणी सुद्धा कुत्र्याने चावा घेतला आहे. गेल्या काही दिवसांत मनुष्यावर भटक्या कुत्र्यांकडून किंवा पाळीव कुत्र्यांकडून हल्ल्याच्या आणि चावा घेण्याच्या घटनांत वाढ होताना दिसून येत आहे. या घटनेमुळे चिंतेत वाढ झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी