Viral Video : जमीन दुभंगली, रस्त्यावर वाहू लागले पाणी, तरुणी जखमी

shocking viral video of road burst in yavatmal and water flow girl got injured in incident : महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ शहरात धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे जमीन दुभंगून रस्त्यावर पाणी वाहू लागले.

shocking viral video
जमीन दुभंगली, रस्त्यावर वाहू लागले पाणी, तरुणी जखमी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • जमीन दुभंगली, रस्त्यावर वाहू लागले पाणी, तरुणी जखमी
  • महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ शहरात धक्कादायक घटना
  • सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटनेचे फूटेज रेकॉर्ड

shocking viral video of road burst in yavatmal and water flow girl got injured in incident : महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ शहरात धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे जमीन दुभंगून रस्त्यावर पाणी वाहू लागले. पाण्याचा प्रवाह एवढा जोरदार होता की दुचाकीवरून जात असलेली एक तरुणी जखमी झाली.

चापडोह धरण ते यवतमाळ शहर या भागात जमिनीखालून टाकलेली पाण्याची पाईपलाईन फुटली. ही घटना अँग्लो हिंदी हायस्कूल जवळच्या एका चौकात घडली. पाण्याच्या दाबामुळे जमिनीखाली असलेली पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यामुळे जमीन दुभंगली आणि रस्त्यावर पाणी वाहू लागले. फुटलेल्या पाईपमधून पाणी वेगाने रस्त्यावर वाहू लागले. पाण्याचा प्रवाह एवढा जोरदार होता की दुचाकीवरून जात असलेली एक तरुणी जखमी झाली.

पाईपलाईन फुटून जमीन दुभंगली त्याचवेळी त्या भागातून तरुणी दुचाकीवरून जात होती. अनपेक्षित अशी घटना घडल्यामुळे तरुणीने दुचाकीचा वेग वाढवून घटनास्थळापासून लांब सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न सुरू केला. पण फुटलेल्या पाईपमधून रस्त्यावर वाहू लागलेल्या पाण्याच्या प्रवाहाचा जोर मोठा होता. यामुळे तरुणी जखमी झाली. 

काही दिवसांपूर्वीच अमृत योजनेंतर्गत जमिनीखालून टाकलेल्या या पाण्याच्या पाईपलाईनचे काम झाले होते. आता ही दुर्घटना घडल्यामुळे यवतमाळमधील अमृत योजनेच्या गुणवत्तेबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. तर काही जणांनी ही पाईपलाईन टाकणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली आहे. 

झोपण्याआधी पाणी पिणे योग्य की अयोग्य?

मजबूत हाडांसाठी खा हे 7 पदार्थ

ज्या भागात पाईपलाईन फुटली त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटनेचे फूटेज रेकॉर्ड झाले आहे. या व्हिडीओत जमीन दुभंगल्याचे, पाणी रस्त्यावर वाहू लागल्याचे आणि तरुणी जखमी झाल्याचे दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी