Viarl Photo | मुंबई : लक्झरी ब्रँड आणि फॅशन कंपनी बॅलेन्सियागाने असा काही बूट तयार केला आहे, ज्यामुळे लोकांनी सोशल मीडियावर कंपनीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. दरम्यान कंपनीने 'पॅरिस स्नीकर' कलेक्शन रिलीज केले आहे. खरं तर 'पॅरिस स्नीकर' कलेक्शनमध्ये समाविष्ट असलेले बूट खूप झिजलेले, फाटलेले दिसत आहेत. (Shoes that look like rubbish cost 48,000).
अधिक वाचा : कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू
दरम्यान, कंपनीने लिमिटेड एडिशन कलेक्शनमध्ये जीर्ण झालेल्या, फाटलेल्या दिसणाऱ्या बूटांच्या १०० जोड्या जारी केल्या आहेत. लक्षणीय बाब म्हणजे या बूटांची किंमत तब्बल ४८,२७९ (६२५ अमेरिकी डॉलर) रूपये आहे. सोशल मीडियावरील काही युजर्संनी कमेंटमध्ये म्हटले की, हे बूट पाहता क्षणी वाटते की कचऱ्याच्या ढिगातून तर उचलून आणले नाहीत ना.
अधिक वाचा : मुंबईसह महाराष्ट्रात उत्तर भारतीय सुरक्षित! : जयंत पाटील
बॅलेन्सियागा (Balenciaga) कंपनीने बूट बनवण्यामागील कारण सांगितले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या बूटांमध्ये क्लासिक डिझाइन आहे, जे मध्ययुगीन ॲथलेटिसिझम प्रतिबिंबित करते. हे बूट काळ्या, पांढर्या आणि लाल रंगात उपलब्ध आहेत. त्यांना एकमेव आणि पुढच्या भागावर पांढरा रबर मिळतो. हे बूट पाहिल्यावर असंही वाटतं की हे बूट याआधी कोणीतरी वापरलेले आहेत.
सोशल मीडियावर बूटांची उडवली खिल्ली
या बूटांची ऑनलाइन विक्री सुरू झाल्यापासून सोशल मीडियावरील युजर्स हे बूट पाहून गोंधळून गेले आहेत. अनेक युजर्संनी म्हटले की बॅलेन्सियागा कंपनीने हे बूट काढून लोकांची खिल्ली उडवली आहे. तर काही युजर्संनी असेही म्हटले आहे की ते बेघर लोकांच्या बूटांपेक्षा वाईट आहेत. तसेच काही युजर्संनी सांगितले की, हे बूट पाहून असे दिसते की बॅलेन्सियागाने बूट घेतले आणि ते आगीत फेकले आहेत.
सध्या कंपनीचे हे बूट युरोपियन बाजारात उपलब्ध आहेत. हे बूट मध्य पूर्व आणि यूएस स्टोअरमध्ये १६ मे पासून उपलब्ध असतील, तर जपानमध्ये ते २३ मे रोजी उपलब्ध होतील. जगभरातील लोक ते ऑनलाइन आंतरराष्ट्रीय स्टोअरमधून खरेदी करू शकतात.