बहिणीने उधार मागताच भावाने २ हजारांसाठी घेतली Stamp Paper वर सही

Offbeat News, Ajab Gajab News : एका उधारी संदर्भातल्या कराराच्या बाबतीत अनोखी घटना घडली आहे.

Sister asked brother for money then he signed her on stamp paper for 2000 rupees
बहिणीने उधार मागताच भावाने २ हजारांसाठी घेतली Stamp Paper वर सही  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बहिणीने उधार मागताच भावाने २ हजारांसाठी घेतली Stamp Paper वर सही
  • कराराची सोशल मीडियावर चर्चा
  • अइमान आणि कासिम यांच्यातील लेखी करार

Offbeat News, Ajab Gajab News : जेव्हा आपल्याकडे पैसे नसतात तेव्हा आपण ओळखीच्या व्यक्तीकडून उधारीवर पैसे घेतो. ही रक्कम मोठी असेल अथवा उधार घेणारा पैसे परत करेल की नाही याची खात्री वाटत नसेल तर लेखी करार करून नंतर पैसे उधारीवर दिले जातात. ही गोष्टी सामान्य आहे. पण एका उधारी संदर्भातल्या कराराच्या बाबतीत अनोखी घटना घडली आहे.

CM Eknath Shinde: शिंदेचा दानवेंवर पलटवार, 'तो काय त्यांचा बॉस आहे...'

Importance of Helmet : म्हणून हेल्मेट वापरा…! हा व्हिडिओ शेअर करत पोलिसांनी दिला संदेश

बहिणीने भावाकडून दोन हजार रुपये उधारीवर मागितले. भाऊ आणि बहीण यांच्यात या व्यवहाराबाबत एक करार झाला. हा करार सोशल मीडियावर व्हायरल झाला. करारात भाऊ आणि बहीण यांच्यातील व्यवहाराची माहिती आहे. बहिणीने भावाकडून कोणत्या दिवशी किती रक्कम उधार म्हणून घेतली आणि कोणत्या दिवशी परत करणार याची सविस्तर माहिती करारात आहे. कराराखाली भाऊ आणि बहीण यांनी सही आणि अंगठा दिला आहे. हा करार म्हणजे भाऊ आणि बहीण यांच्यातील एक स्टँप पेपर आहे, असे मत सोशल मीडियावर व्यक्त झाले. अनेकांनी या मताशी सहमती व्यक्त केली. भाऊ-बहीण यांच्यातील हा दोन हजार रुपयांच्या व्यवहाराचा 'स्टँप पेपरवरील करार' व्हायरल होत आहे. भावाने बहिणीची सवय ओळखून हा करार केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

Lip lock video viral: कॉलेज विद्यार्थ्यांचं लीप लॉक चॅलेंज, व्हिडिओ व्हायरल झाला आणि मग...

करारात नमूद माहितीनुसार १८ जुलै २०२२ रोजी अइमानने कासिमकडून दोन हजार रुपये उधार घेतले आहेत. अइमान दोन हजार रुपये १५ ऑगस्ट २०२२ रोजी कासिमला परत करणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी