पतीसोबत संबंध ठेवणाऱ्या बहिणीची ऑफिसमध्ये घुसून धुलाई; मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

व्हायरल झालं जी
Updated Sep 13, 2021 | 16:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

महिलेकडून बहिणीला कार्यालयात केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. 40 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिला आहे.

 Sister who had an affair with husband women beat broke into office, video goes viral
पतीसोबत संबंध ठेवणाऱ्या बहिणीची ऑफिसमध्ये घुसून धुलाई  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • मुलाखत देताना मुलीला मारहाण
  • महिलेने बहिणीला शिक्षा केली
  • आपल्या बहिणीचे तिच्या पतीशी असलेल्या नात्यावर बाई रागावली

वॉशिंग्टन : सोशल मीडियावर अनेक मजेदार व्हिडिओ आहेत, परंतु हे व्हिडिओ पाहून तुम्हाला खरोखर आश्चर्य वाटेल.  मुलाखत देणाऱ्या एका मुलीला  तिच्या बहिणीला धु-ुधु घुतले. बहिणीने आपल्या बहिणीची का धुलाई केली, याचं कारण ज्या सर्वांना माहिती पडलं प्रत्येकांनी आपल्या माथ्यावर हात लावला. मुलाखत देणाऱ्या मुलीचे तिच्या बहिणीच्या पतीशी अनैतिक संबंध होते, ही गोष्टी जेव्हा तिच्या बहिणीला कळाली तेव्हा तिने तिच्या बहिणीची मुलाखत देत असतानाच धुलाई केली.   (Sister who had an affair with husband women beat broke into office, video goes viral)

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला

एका मुलीला मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक मुलगी ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून मुलाखत देत आहे. मग एक महिला त्या कार्यालयात प्रवेश करते आणि मुलीचे केस पकडून तिला खाली पाडते. यानंतर, ती मुलीच्या डोक्यावर मारू लागते. या दरम्यान, कार्यालयात उपस्थित लोक घटनास्थळी पोहोचतात आणि मुलीला निघून जाण्यास सांगतात पण ती महिला तिला सतत मारहाण करत राहते.  डॅलस नावाच्या ट्विटर युजर्सने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

 


मारहाणीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला

असे सांगितले जात आहे की, कार्यालयात उपस्थित असलेल्या कोणीतरी गुपचूप मुलीच्या मारहाणीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला.  हा व्हिडिओ आतापर्यंत 40 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि 56 हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. त्याचबरोबर 10 हजारांहून अधिक लोकांनी रिट्विटही केले आहे.

युजर्सने अशा प्रतिक्रिया दिल्या

युजर्स या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने सांगितले की, महिलेने तिच्या बहिणीला जेवढे निर्घृणपणे मारले आहे, तेवढेच तिने तिच्या पतीलाही मारले पाहिजे. यात तिच्या पतीचाही तितकाच दोष आहे. त्याचवेळी, दुसऱ्या युजर्सने सांगितले की, या मुलीला नक्कीच नोकरी मिळाली पाहिजे आणि तिला आरोग्य विमा मिळाला पाहिजे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी