6 Feet Cobra at Railway Office | टेबलावर बसला सहा फुटी बॉस, काढला फणा आणि केलं ‘फुस्स’

नेहमीप्रमाणे रेल्वेचा कारभार सुरू होता. ठरल्या वेळी कर्मचारी कार्यालयात आला. आपल्या खुर्चीवर बसला. समोर पाहतो तर काय? एक सहा फुटी अजस्त्र कोब्रा फणा काढून बसलेला. जणू काही ऑफिसमधला बॉसच...

6 Feet Cobra at Railway Office |
ऑफिसच्या टेबलवर कोब्रा असा फणा काढून बसला होता.  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कोटा विभागातील रेल्वे स्टेशनच्या कार्यालयात सहा फुटी कोब्रा
  • कर्मचाऱ्यापुढे टेबलावर फणा काढून उभा राहिला खतरनाक कोब्रा
  • रेल्वे कर्मचाऱ्याच्या धीरोदात्तपणाचं जोरदार कौतुक

6 Feet Cobra at Railway Office | गर्दीनं खचाखच भरलेल्या (Crowded) आणि अत्यंत वर्दळीच्या रेल्वे स्थानकाच्या (Railway Station) पॅनल रुममध्ये (Panal Room) एक आगंतुक पाहुणा आला आणि त्यानं जोरदार खळबळ उडवून दिली. राजस्थानमधील कोटा रेल्वे स्टेशनवर (Kota Railway Station) हा प्रकार घडला. कोटा विभागाच्या रावता रेल्वे स्थानकातील एका टेबलावर चक्क 6 फूट लांब कोब्रा नाग आपला फणा काढून बॉस असल्याप्रमाणे बसला होता. एका पत्रकाराने या नागाचा आणि त्याच्यासमोर आपलं काम करत बसलेल्या कर्मचाऱ्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. काही मिनिटांतच हा फोटो जोरदार व्हायरल झाला असून तो पाहणारे थक्क होत आहेत.

वाहतुकीवर कुठलाही परिणाम नाही

रेल्वेच्या पॅनल रुममध्ये हा कोब्रा नाग येऊन बसला होता, अशी माहिती पत्रकार दीपक कुमार झा यांनी ट्विटरवरून जाहीर केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रावता रोड रेल्वे स्टेशनवरील पॅनल रुममध्ये ही घटना घडली. इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे हजारो विद्यार्थ्यांची या रेल्वे स्थानकात सतत वर्दळ असते. अत्यंत गर्दीच्या रेल्वे स्थानकांपैकी कोटा विभागातील रेल्वे स्थानकं मानली जातात. या रेल्वे स्टेशनवर नेहमीप्रमाणे येऊन कर्मचाऱ्याने आपलं काम सुरू केलं. मात्र शेजारच्या टेबलावर फणा काढून बसलेला अतिविषारी कोब्रा नाग पाहून त्याला धक्का बसला. 

कर्मचाऱ्याची शांत प्रतिक्रिया

आपल्या कार्यालयात शेजारच्या टेबलावर एवढा महाभयंकर सहा फुटी कोब्रा फणा काढून उभा असल्याचं पाहून कुणाचीही पाचावर धारण बसली असती. मात्र या कर्मचाऱ्याला जणू रोजची सवय असल्याप्रमाणे तो शांत राहिला. नागापासून सुरक्षित अंतरावर जाऊन तो बसला आणि परिस्थिती नियंत्रणात येण्याची वाट पाहू लागला. 

फोटो पाहून आश्चर्य

रेल्वेच्या पॅनल रुममध्ये कोब्रा नाग शिरल्याचा फोटो पाहून ट्विटर युजर्सनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. इतक्या वर्दळीच्या ठिकाणी हा नागोबा गेलाच कसा, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ट्विटर युजर्सनी फारच बोलक्या प्रतिक्रिया या घटनेवर दिल्या आहेत. 

“होली S…T! एवढा मोठा नाग पाहून कुणालाच कसा फरक पडला नाही? आणि शेजारी बसलेला हा कर्मचारी इतका शांत कसा?”

“मला फोटो पाहूनच घाम फुटला. हा कर्मचारी इतक्या निर्विकारपणे तिथं कसा काय बसून राहू शकतो?” अशा वेगवेगळ्या आश्चर्यमिश्रित प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

वाहतुकीवर परिणाम नाही

कोब्रा नाग कार्यालयात घुसूनही रेल्वेच्या वाहतुकीवर आणि व्यवस्थापनावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. या बाबीचंही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नागाला पाहून सगळे कर्मचारी सैरावैरा धावू लागले असते, तर त्याचा रेल्वेच्या नियंत्रण कक्षावरही परिणाम झाला असता आणि वाहतूक विस्कळीत होऊ शकली असती. मात्र कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे हा प्रकार टळला. 

माकडानंतर कोब्राचा किस्सा

गेल्या वर्षी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लाउंज परिसरात एक माकड शिरल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत होतं. फूड स्टॉलवर डल्ला मारून तिथलं फळांचं ज्यूस पित बसलेल्या माकडाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता हा नागोबा जोरदार व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी