सहा बोटे असलेल्या व्यक्ती असतात हुशार

व्हायरल झालं जी
Updated Jun 11, 2019 | 12:55 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

ज्या लोकांच्या हाताला अथवा पायाला सहा बोटे असतात त्यांना कोणतेही आजार होत नाही. तर इतर सामान्य व्यक्तींच्या तुलनेत या व्यक्ती भाग्यवान असतात. या व्यक्ती प्रत्येक कामने वेगाने करतात.

hritik roshan
हृतिक रोशन 

मुंबई: तुम्ही बऱ्याच लोकांच्या हाताला पाच नव्हे तर सहा बोटे पाहिली असतील. बऱ्याच कशाला बॉलिवूडचा अभिनेता हृतिक रोशनच्याही एका हाताला सहा बोटे आहेत. असं म्हणतात की हा आजार आहे मात्र आम्ही तुम्हाला सहा बोटे असलेल्या व्यक्तींबाबतच्या खास गोष्टी सांगणार आहोत. जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. जर्मनची युनिर्व्हसिटी ऑफ फ्रीबर्ग अँड इंपीरियल कॉलेजच्या एका रिपोर्टमध्ये हा खुलासा करण्यात आला आहे. ज्या लोकांच्या हाताला अथवा पायाला सहा बोटे असतात त्यांना कोणता आजार नसतो तर त्या व्यक्ती इतर सामान्य व्यक्तींच्या तुलनेत भाग्यवान असतात. याला विज्ञानाच्या भाषेत पॉलिडेक्टिली म्हणतात. 

अशा व्यक्ती इतर लोकांच्या तुलनेत वेगाने तसेच हुशारीने काम करता. या व्यक्ती वेगाने काम करतात जसे टायपिंग असो वा गेम खेळणे असो वा अन्य कोणतेही काम. इतकेच नव्हे तर या व्यक्तींची बुद्धी इतर व्यक्तींच्या बुद्धीपेक्षा तल्लख असते. संशोधनकर्त्यांचे म्हणणे आहे की भविष्यात बनवल्या जाणाऱ्या रोबोटमध्ये सहा बोटे असायला हवीत ज्यामुळे तो अधिक स्फूर्तीने काम करू शकेल. 

नेचर कम्युनिकेशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार सहा बोटे असलेल्या व्यक्तींमध्ये हे अधिकचे बोट अंगठा आणि तर्जनीच्या दरम्यान असते. त्यामुळे या व्यक्ती इतर व्यक्तींच्या तुलनेत सोप्या पद्धतीने काम करू शकतात. या व्यक्ती खूप उत्साहाने काम करतात. दरम्यान, या व्यक्तींना हातात ग्ल्व्हज आणि पायात मोजे घालणे कठीण होते. 

युनिर्व्हसिटीच्या एका प्रोफेसरने सांगितले, या व्यक्ती निर्सगाची देण असतात. प्रत्येक गोष्टीत यांना भाग्यवान मानले जाते. याचे उदाहरण म्हणजे प्रसिद्ध स्वप्ना बर्मन ज्यांच्या पायाला ६ बोटे आहेत. असे असतानाही तिने २०१८मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत हेप्थॅलॉनमध्ये भारताला पहिल्यांदा गोल्ड मेडल मिळवून दिले होते. दुसरीकडे प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनलाही सहा बोटे आहेत. हृतिक आपल्या अंदाजाने नेहमीच चाहत्यांची मने जिंकत अशतो. लोक त्याच्या फिटनेस आणि अॅक्शनचे चाहते आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
सहा बोटे असलेल्या व्यक्ती असतात हुशार Description: ज्या लोकांच्या हाताला अथवा पायाला सहा बोटे असतात त्यांना कोणतेही आजार होत नाही. तर इतर सामान्य व्यक्तींच्या तुलनेत या व्यक्ती भाग्यवान असतात. या व्यक्ती प्रत्येक कामने वेगाने करतात.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola