१४  लाख खर्च करून एका रात्रीत बनवलेल्या सिक्स पॅक अ‍ॅब्स!

दोन मुलं असलेल्या एका बापाने आपल्या वाढत्या वजनाने त्रस्त असल्याने एका रात्रीत सिक्स पॅक अॅब्स बनवले आहेत.

danial_tills six pack abs
१४  लाख खर्च करून एका रात्रीत बनवलेल्या सिक्स पॅक अ‍ॅब्स!  |  फोटो सौजन्य: Instagram

वाढत्या वयानुसार, केवळ शरीराच्या व्याधीच वाढत नाहीत अनेकांचे वजन देखील वाढत जाते. अशावेळी शरीरावर सुरकुत्या देखील दिसू लागतात आणि शरीर विचत्र आणि बेढब  दिसू लागते. त्यामुळे असं शरीर कुणालाही आवडत नाही. ही समस्या पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही स्पष्टपणे दिसून येते. आज आम्ही आपल्याला एका अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत की, जो २ मुलांचा पिता आहे आणि त्याने त्याचे वाढलेले वजन कमीच केले नाही तर अगदी काही दिवसांमध्येच त्याने  सिक्स पॅक अॅब्सही देखील बनवून दाखवले.

जरी आपण असा विचार करत असाल की, यासाठी त्याने जिम व्यायाम आणि बॉडी बिल्डिंग फूड प्रोडक्टकडे लक्ष दिलं असेल तर ही चुकीचा विचार करत आहात. या व्यक्तीने लिपोसक्शन सर्जरीद्वारे आपल्या शरीरात हा संपूर्ण बदल घडवून आणला आहे. ३९ वर्षीय डॅनियल टिल्सने १४ लाखांहून अधिक रुपये म्हणजेच जवळजवळ १५,००० पाऊंड यासाठी खर्च केले  आहेत. फक्त लिपोसक्शन शस्त्रक्रियेसाठी त्याने हे पैसे मोजले आहेत. या सर्जरीनंतर अवघ्या काही तासातच त्याचे सिक्स पॅक अ‍ॅब्स शरीरावर दिसू लागले. 

एका मुलाखतीत त्याने सांगितले की, 'तो आता वयाची चाळीशी पूर्ण करणार आहे. त्यामुळे त्याला आपल्या शरीराबाबत जरा चिंता वाटू लागली आहे.' त्याने यावेळी असंही सांगितले की, त्याची पत्नी तिचे सौंदर्य टिकवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कॉस्मेटिक ट्रीटमेंटचा अवलंब करीत आहे. यावेळी बोलताना आपल्या शस्त्रक्रियेमागचं नेमकं कारण सांगितलं की, त्याला दोन मोठी मुले आहेत आणि त्याच्या समोर त्याला एक 'कूल डॅड' बनून राहायचं आहे. जेणेकरून मुलांसोबत बाहेर जाताना त्याला संकोचल्यासारखं वाटू नये. 

पुढे तो असंही म्हणाला की, 'सुरुवातीला मी जिममध्ये जाऊ लागलो, परंतु बर्‍याच महिन्यांनंतरही मला स्वतःमध्ये काहीही फरक दिसला नाही. त्यानंतर मी कॉस्मेटिक सर्जनकडे गेलो. डॉक्टरांनी मला सांगितले की, आपल्याला एका रात्रीत शस्त्रक्रिया करून सिक्स पॅक अॅब असलेले शरीर विकसित करता येईल. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.'

या शस्त्रक्रियेबाबत सांगताना तो म्हणाला की, 'माझी शस्त्रक्रिया रात्री १२.३० वाजता सुरू झाली आणि सकाळी मी स्वत:ला पूर्णपणे वेगळा दिसत असल्याचं मला जाणवलं.' दरम्यान, शस्त्रक्रियेच्या दोन दिवस आधी त्याला मेडिकेशनवर ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, या शस्त्रक्रियेनंतर आपण आपली लाइफस्टाइल आणि डाएट याकडे पूर्णपणे लक्ष देणार असल्याचेही त्याने सांगितले. जेणेकरुन आता जे शरीरातील बदल आहेत ते कायम राहावे.

त्याने पुढे असं म्हटलं आहे की, 'आता मी नियमित जिममध्ये जातो आणि माझ्यामध्ये पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वास असल्याचे मला जाणवते.' त्याला आता आपण वयस्कर वडील आहोत असं अजिबात वाटत नाही. एका अहवालानुसार, आधुनिक कॉस्मेटिक उपचारांमध्ये लिपोसक्शन एक अतिशय लोकप्रिय उपचार पद्धती मानली जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी