Covid Lockdown in China । नवी दिल्ली : भारतात वेगाने होत असलेल्या लसीकरणामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश आले आहे. मात्र जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा दररोज लाखो रूग्ण येऊ लागले आहेत. चीनमधील काही शहरांमध्ये जिथून कोरोनाचा जन्म झाला तिथे वाढत्या केसेसमुळे लॉकडाऊन लागू करावा लागला आहे. त्यामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. शांघाय हे चीनमधील एक शहर आहे, या शहरात वाढत्या कोरोनाच्या रूग्णांमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे येथील अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या ऑफिसमध्येच थांबावे लागत आहे. (Sleeping in an office in China earns thousands of rupees).
अधिक वाचा : वाढत्या आर्थिक संकटामुळे श्रीलंकेत आणीबाणी जाहीर
शांघाय चीनमधील एक प्रमुख शहर आहे जिथे प्रमुख कंपन्याशिवाय मोठ्या प्रमाणात बॅंकाची संख्या आहे. शांघाय हे शहर आहे जिथे चीनचे प्रमुख स्टॉक एक्सचेंज देखील आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ऑफिसमध्येच राहण्याची व्यवस्था करत आहेत. म्हणजेच काम संपल्यावर कर्मचारी ऑफिसमध्ये राहून तिथेच विश्रांती घेतील. यासाठी संबंधित कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक रात्रीला हजारो रूपये अतिरिक्त देत आहेत.
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, कर्मचाऱ्यांना एका रात्रीच्या मुक्कामासाठी ६,००० ते २२,००० रुपये मिळत आहेत. यादरम्यान कर्मचाऱ्यांना रात्रीचे जेवण, नाश्ता, झोपण्याची सोय अशा सर्व सुविधा देखील पुरविण्यात येत आहेत.
काही दिवसांपूर्वी चीनमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये एका कंपनीचे कर्मचारी गादीवर झोपलेले दिसत होते. त्याचवेळी काही लोक बाथरूममध्ये तोंड धुताना दिसले. लक्षणीय बाब म्हणजे शांघायमध्ये कोविडच्या रूग्णांनी आक्रमक रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे, आतापर्यंत येथे २५ हजारांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत, त्यानंतर सरकारने येथे कोविड लॉकडाऊन लागू केले आहे.