जास्त होमवर्कबाबत काश्मिरच्या चिमुकलीची मोदींकडे तक्रार

व्हायरल झालं जी
Updated Jun 01, 2021 | 15:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

लहानग्या मुलीने म्हटले की, इतके मोठे ओझे मुलांवर का टाकले जात आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुलीचा हा व्हिडिओ १ मिनिट ११ सेकंदाचा आहे. 

viral video
जास्त होमवर्कबाबत काश्मिरच्या चिमुकलीची मोदींकडे तक्रार 

थोडं पण कामाचं

  • मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी तातडीने कारवाई केली
  • शाळेच्या मुलांवरील घरच्या अभ्यासाचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाला ४८ तासांच्या आत नीती तयार करण्याचे आदेशदिले आहे.
  • कोरोना काळात सध्या ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. मात्र यामुळे मुले वैतागली आहेत. या मुलीनेही कंटाळून पंतप्रधान नरेंद्र मोदींना भावूकपणे आवाहन केले आहे. 

मुंबई: सध्या सोशल मीडियावर(social media) एका चिमुकल्या गोड मुलीचा व्हिडिओ व्हायरल(small girl video viral on social media) होत आहे. ही चिमुकली इतक्या निरागसतेने बोलत आहे की ऐकणारा नक्कीच भावूक होईल. व्हिडिओमध्ये दिसत असलेली ६ वर्षांची चिमुकली काश्मीरमध्ये राहणारी आहे. कोरोना काळात सध्या ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. मात्र यामुळे मुले वैतागली आहेत. या मुलीनेही कंटाळून पंतप्रधान नरेंद्र मोदींना भावूकपणे आवाहन केले आहे. (small kashmir girl video viral on social media)

मुलीचा निरागस व्हिडिओ

व्हिडिओमध्ये ही चिमुकली म्हणत आहे की, अस्सलाम अलैकुम मोदी साहेब, मी एक मुलगी बोलत आहे. पुढे ही चिमुकली म्हणते, जी मुले ६ वर्षांची असतात त्यांना जास्त काम का दिले जाते. आदी इंग्रजी, गणित, उर्दू, ईव्हीएस आणि त्यानंतर कम्प्युटर क्लास. माझा क्लास सकाळी १० वाजल्यापासून सुरू होतो तो दुपारी २ वाजेपर्यंत सुरू असतो. इतकं काम तर मोठ्या मुलांकडे असतं. 

राज्यपालांनी घेतली दखल

मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी तातडीने कारवाई केली आहे. त्यांनी लिहिले की, ही खूपच निरागस तक्रार आहे. शाळेच्या मुलांवरील घरच्या अभ्यासाचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाला ४८ तासांच्या आत नीती तयार करण्याचे आदेशदिले आहे. मुलांची निरागसता हे देवाचे देणे आहे आणि त्यांचे जीवन हे आनंद आणि आनंदाने भरलेले असले पाहिजे.

व्हिडिओ झाला व्हायरल

या निरागस मुलीचे म्हणणे आहे की इतके ओझे मुलांवर का टाकले जात आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मुलीचा हा व्हिडिओ १ मिनिट ११ सेकंदाचा आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ तब्बल ४ लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी