माणसाला साप चावला आणि त्यानंतर जे काही घडलं ते ऐकून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

व्हायरल झालं जी
Updated Sep 01, 2019 | 15:28 IST | टाइम्स नाऊ हिंदी

साप चावल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल. मातर्, आता असं एक वृत्त समोर आलं आहे ज्यात एका माणसाला साप चावला आणि त्यानंतर चक्क सापाचाच मृत्यू झाला आहे.

Snake
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • बिहारमधील प्रतापगढ येथे घडली आश्चर्यकारक घटना
  • ५५ वर्षांच्या व्यक्तीला साप चावला
  • बागेत काम करताना साप चावला
  • साप चावल्यानंतर चक्क सापाचाच झाला मृत्यू
  • ज्या व्यक्तीला साप चावला तो सुखरूप

पाटणा: एखाद्या व्यक्तीला सर्प दंश झाल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल. मात्र, ज्या व्यक्तीला साप चावला तो व्यक्ती सुखरूप असून सापाचाच मृत्यू झाल्याचं कधी तुम्ही ऐकलं आहे का? नाही ना. पण अशीच एक घटना समोर आली आहे. बिहारमधील प्रतापगढ येथे ही आश्चर्यकारक घटना घडली आहे. विषारी सापाने ज्या व्यक्तीला दंश केला तो चांगला असून त्या सापाचाच मृत्यू झाला आहे.

रिपोर्ट्सनुसार, बिहारमधील सुपौल जिल्ह्यात असलेल्या प्रतापगढ येथील सुखानगर गावात हा प्रकार घडला आहे. सुखानगर गावात राहणारे सुबोध प्रसाद सिंह हे बागेत काम करण्यासाठी गेले होते. त्याच दरम्यान झुडपात साप असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं तितक्यात त्यांना साप चावला. यावेळी सुभोध यांनी घाबरून न जाता हुशारीने काम केलं. 

५५ वर्षीय सुबोध यांनी ज्या ठिकाणी साप चावला होता त्याच्या वरील बाजुला आपल्याकडील धागा आणि कपडा घट्ट बांधला. त्यानंतर सुबोध यांच्या कुटुंबियांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी सुबोध यांच्यावर उपचार केले. त्यानंतर सुबोधचे कुटुंबिय पुन्हा बागेत आले तेव्हा तेथील दृश्य पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण, सुबोध यांना जो साप चावला होता तो साप त्या ठिकाणी मृतावस्थेत आढळला.

या प्रकरणानंतर प्रतापगंज येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हरेंद्र प्रसाद साहु यांनी सांगितले की, एका ठराविक काळात सापाला खूपच वेदना होत असतात आणि त्या दरम्यान त्या सापाने एखाद्या व्यक्तीला दंश केला तर बहुतांश विष हे त्या सापाच्याच तोंडात राहतं. यामुळे सापाचा मृत्यू होऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये एका ७० वर्षीय वयोवृद्धाला सापाने दंश केला होता त्यानंतर या व्यक्तीने सापाचाच चावा घेतला. यानंतर या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...