Snake on Sun: सूर्याच्या आतमध्ये फिरत राहतो एक साप, विश्वास नसेल तर पाहा व्हिडिओ

सूर्याच्या आतमध्ये फिरत असणाऱ्या या घटकाला Serpent inside sun असं नाव देण्यात आलं आहे. वास्तविक सूर्याचं तापमान इतकं जास्त असतं की तिथे कुठलाही जीव जिवंत राहणं अवघड असतं. सूर्याच्या आत दिसणारी सापासारखी आकृती ही साप किंवा इतर कुठल्याही जिवाची नसून सौर लहरींची असल्याचं शास्त्रज्ञ सांगतात.

Snake on Sun
सूर्याच्या आतमध्ये फिरत राहतो एक साप  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सूर्याच्या आतमध्ये फिरत राहतो साप
  • वैज्ञानिकांनी उकलले सापाच्या आकृतीचे गूढ
  • प्लाझ्माची हालचाल दिसते सापाप्रमाणेच

Snake on Sun: सूर्याच्या (Sun) आतमध्ये सतत एक साप (Sun) फिरत राहतो, असा दावा काही वैज्ञानिकांनी (Scientists) केला आहे. सूर्याचा प्रकाश इतका प्रखर असतो की त्याच्याकडे पाहणंच आपल्याला शक्य होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला ही गोष्ट दिसत नाही. मात्र सूर्याच्या चारही बाजूंना फिरणाऱ्या युरोपियन स्पेस एजन्सीच्या सोलर ऑर्बिटरने (Solar orbiter) याचा व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओत सूर्याच्या आतमध्ये वेगाने फिरणाऱ्या एका सापाची आकृती दिसत असल्याचा दावा केला जातो आहे. ही आकृती सूर्याच्या आतमध्ये फिरत असल्याचं दिसतं आणि ती तिथे कायमस्वरुपी असल्याचंही आढळून आल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. 

सापाचं बारसं

सूर्याच्या आतमध्ये फिरत असणाऱ्या या घटकाला Serpent inside sun असं नाव देण्यात आलं आहे. वास्तविक सूर्याचं तापमान इतकं जास्त असतं की तिथे कुठलाही जीव जिवंत राहणं अवघड असतं. सूर्याच्या आत दिसणारी सापासारखी आकृती ही साप किंवा इतर कुठल्याही जिवाची नसून सौर लहरींची असल्याचं शास्त्रज्ञ सांगतात. एक मोठ्या स्फोटातून निघणाऱ्या सौर लहरींचा तो आकार आहे. त्याच्या डोळ्यांना दिसणाऱ्या हालचाली या सापाप्रमाणे असतात. या लहरी सूर्याच्या जवळ येत आणि जात राहतात. मात्र सूर्यासमोर आल्यानंतर एखाद्या सापाप्रमाणे या आकृती दिसणं, हे एक विलोभनीय दृश्य असल्याचं सांगितलं जातं. 

अधिक वाचा - World’s Largest Feet: या महिलेचे पाय आहेत जगात सर्वात मोठे, साईज वाचून बसेल धक्का

सूर्याच्या जवळून चित्रिकरण

या व्हिडिओत सूर्यावर एखादा साप फिरत असावा, असं चित्र दिसतं. हा व्हिडिओ 5 सप्टेंबर 2022 या दिवशी तयार करण्यात आला होता. सूर्याच्या सर्वात जवळून हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. सोलर ऑर्बिटरचा अंतराळातील प्रवास सुरू असताना सूर्याच्या ज्या भागात या लहरी दिसतात, त्या भागाचे चित्रिकरण करण्यात  आले. त्यामुळे सूर्याच्या पृष्ठभागावरील हा अद्भूत नजारा पाहायला मिळाल्याचं सांगितलं जातं. सौर लहरी सूर्याच्या पृष्ठभागावरून प्रवास करत असल्याचं यात दिसतं. या लहरी एका मिनिटांत कोट्यवधी किलोमीटरचा टप्पा पार करत असल्याचं दिसतं. 

अधिक वाचा - Snake Bite Effect: साप चावल्यानंतर ‘अशी’ होते रक्ताची गुठळी, विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ पाहा

सापाप्रमाणे हालचाली

जेव्हा सोलर ऑर्बिटर सूर्याजवळ पोहोचला, तेव्हा सापासारख्या दिसणाऱ्या लहरी सूर्याजवळून जातानाचं दृश्य कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आलं. जेव्हा प्लाझ्माचं तापमान सूर्याच्या इतर भागातील तापमानापेक्षा थोडं कमी होतं, तेव्हा या लहरी दिसत असल्याचं सांगितलं जातं. सूर्याच्या पृष्ठभागावरील प्लाझ्मा एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाताना पाहणं, हा एक अनोखा वैज्ञानिक साक्षात्कार मानला जातो. एका विशिष्ट ठिकाणावरून पाहिल्यामुळेच या लहरींचा एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे होणारा प्रवास पाहता येऊ शकतो. सौर चुंबकीय क्षेत्र हा वैज्ञानिकांसाठी नेहमीच एक आव्हानात्मक विषय मानला जातो. सूर्याच्या वायूमंडळात फिरणारे प्लाझ्मा हे प्रत्यक्षात चार्ज्ड पार्टिकल्स असतात. चुंबकीय शक्तीमुळे ते एकीकडून दुसरीकडे फिरत असतात. या घटनेचा व्हिडिओ सध्या विज्ञानप्रेमींमध्ये चांगलाच लोकप्रिय होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी