Snake Romance Video : सोशल मीडियावर दररोज कुठले ना कुठले तरी व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर जंगलातल्या प्राण्यांचे व्हिडीओ खुप व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक नाग आणि नागिणीचे प्रणयदृश्य कॅमेर्यात कैद झाले आहेत आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अशा प्रकारचे दृश्य फार कमी वेळेला दिसतं. (snake romance video gone viral on social media)
अधिक वाचा : King Cobra in Toilet: टॉयलटमध्ये दिसला साप; काढला फणा, व्हिडीओ व्हायरल
snake._.world या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आल आहे या व्हिडीओमध्ये एक नाग आणि नागीण प्रणय करताना दिसत आहे. एका शेतातला हा व्हिडीओ असून तब्बल दहा फुटांचा नाग आणि नागीण दिसत आहे. दोघांचे शरीर एकमेकांना लपटलेले असून दोघे प्रणय करताना दिसत आहे. कधी कधी दोघांचे शरीर हवेत हेलकावे खाताना दिसत आहे. एकाच चित्रात दोघांचा प्रणय सुंदर दिसत आहे. हिंदी चित्रपटात अनेक वेळेले सापांच्या चित्रपटात असे दृश्य दाखवण्यात येते. परंतु खर्या आयुष्यात असे दृश्य पाहणे दुर्मीळ आहे.
अधिक वाचा : Miracle : पिल्लू खड्ड्यात पडल्यामुळे हत्तीण झाली बेशुद्ध, मग घडला चमत्कार, पाहा VIDEO
snake._.world या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट झालेल्या या व्हिडीओला खुप लाईक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत. या व्हिडीओला लाखो व्ह्युज मिळाले आहेत. फक्त snake._.world च नव्हे तर इन्स्टाग्रामच्या अनेक अकाऊंट्स आणि सोशल मीडियाच्या अनेक अकाऊंट्सवरून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
अधिक वाचा : मुक्याने जीवाने दाखवली माणुसकी, जीवाची पर्वा न करता हत्तीने वाचवला माहूताचा जीव!
अधिक वाचा : बॉयफ्रेंड कुणाचा? महाविद्यालयीन तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी
सापाबद्दल भारतीय समाजात अनेक अख्यायिक आणि गैरसमज आहेत. नागाकडे नागमणी असतो, नाग इच्छाधारी असतो, सापाची कात घरात ठेवल्यास आर्थिक स्थिती सुधरते, नागाच्या एका जोडीदाराला मारल्यास त्याचा जोडीदार बदला घेतो असे अनेक गैरसमज प्रचलित आहेत. इतकेच नाही तर नागाचा प्रणय पाहिल्यास अचानक धनलाभ होतो असाही गैरसमज प्रचलित आहेत.