VIDEO: विजेच्या खांबावर चढला १० फूट लांब साप, नंतर जे घडले ते...

व्हायरल झालं जी
Updated Jun 10, 2021 | 13:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

Snake Video:सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. हा व्हिडिओ इंदूरमधील आहे यात एक साप विजेच्या खांबावर चढला आहे. 

snake video
VIDEO: विजेच्या खांबावर चढला १० फूट लांब साप, नंतर जे घडले  

थोडं पण कामाचं

  • विजेच्या खांबावर चढला १० फूट लांब साप
  • इंदूरच्या जागृती कॉलनीचा हा व्हिडिओ आहे, करंट लागल्याने जखमी झाला साप
  • सोशल मीडियावर व्हायरल झाला सापाचा हा व्हिडिओ

इंदूर: विजेच्या तारांना स्पर्श केल्याने झटका बसतो हे मनुष्यप्राण्याला माहीत आहे मात्र प्राण्यांना याची काहीच कल्पना नसते. याच कारणामुळे अनेकदा त्यांना याचा त्रास होतो. असेच काहीसे मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये घडले आहे. येथे एक साप विजेच्या खाबावर चढला. साधारण १० फुटांचा हा साप जेव्हा हायवोल्टेज लाईनवर चढल्यानंतर सारेच हैराण झाले. लोकांनी लगेचच याचा व्हिडिओ बनवला आणि सापाला खांबावर चढताना लोकही भयभीत झाले. snake video viral who climb on light poll

इंदूरचा आहे हा व्हिडिओ

कोणीतरी याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. ही घटना इंदूरच्या सिंधी कॉलनीच्या जागृतीनगरमधील आहे. येथे १० फुटांचा साप सरपटत केबलच्या माध्यमातून विजेच्या खांबाजवळ पोहोचला आणि पाहता पाहता विजेच्या तारांपर्यंत पोहोचला. यादरम्यान सापाने उतरण्याचा प्रयत्न केला तेव्हा अचानक जोरात धमाका झाला आणि साप तब्बल २५ फूट जमिनीवर धडाम करून खाली पडला. सापाला इतक्या जोरात विजेचा झटका लागला की तो जमिनीवर बराच वेळ तडफडत होता. 

गंभीर जखमी झाला साप

यात साप गंभीर पद्धतीने जखमी झाला. मात्र मेला नाही. तो जमिनीवरून जोरात सरपटण्याचा प्रयत्न करत होता मात्र करंट लागल्याने तो गंभीर जखमी झाला. यानंतर या भागातील लोकांनी सर्पमित्राला बोलावले आणि सापाला घेऊन  जाऊन त्याने जंगलात नेऊन सोडले. सोशल मीडियावर सापाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

एका ट्विटर युझरने लिहिले की मानवाच्या यंत्रमय आयुष्याने जंगली प्राण्यांचे आयु्ष्य अतिशय दु:खकर केले आहे. जंगली प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. आम्ही कधीपर्यंत त्यांच्या जगण्याचा हक्क हिरावून घेत राहणार आहोत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी