Viral Video of Snake : खुर्चीत भलत्याच जागी लपला साप, VIDEO बघून फुटेल घाम

एका खुर्चीत एक साप वेटोळं करून बसल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. कुणालाही धक्का बसेल असाच हा व्हिडिओ आहे.

Viral Video of Snake
खुर्चीत भलत्याच जागी लपला साप  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • खुर्चीत बसला होता साप
  • व्हिडिओ पाहून बसेल धक्का
  • खुर्चीवर बसण्यापूर्वी घ्या काळजी

Viral Video of Snake | साप पाहिला की भल्याभल्यांची गाळण उडते. सापापासून दूर राहा, असा सल्ला नेहमीच एकमेकांना दिला जातो. साप हा निसर्गचक्रातील एक महत्त्वाचा घटक असला तरी त्याच्या विषारी गुणांमुळे माणसं त्याला सतत घाबरून असतात. साप दिसला तर त्याच्या जवळ जाण्याचं धाडसही अनेकांना होत नाही. काही साप तर इतके विषारी असतात की त्यांनी दंश केल्यावर काही मिनिटांतच माणसाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. आपल्या आजूबाजूला असणारे बहुतांश साप हे बिनविषारी असतात. मात्र नेमका कुठला साप विषारी आणि कुठला बिनविषारी याची नेमकी माहिती सामान्य माणसांना नसते. त्यामुळे प्रत्येक सापाला माणसं घाबरत असतात. 

सापानं पकडली भलतीच जागा

सध्या साप एका खुर्चीत लपून बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा साप खुर्चीत अशा ठिकाणी लपून बसला होता, ज्याची कल्पना केली तरी अंगावर काटा येईल. प्रत्येक खुर्चीची रचना वेगवेगळी असते. काही खुर्च्या या पायाकडे निमुळत्या होत जाणाऱ्या आणि आतमध्ये पोकळ जागा असणाऱ्या असतात. अशाच खुर्चीत हा साप जाऊन बसला होता. साधारणतः आपल्या घरी असणारी खुर्ची दरवेळी बसताना आपण तपासत नाही. मात्र अशा प्रकारची खुर्ची जर असेल, तर प्रत्येकवेळी खुर्चीच्या चारही पायांच्या आतील पोकळीत वाकून पाहणं आणि काहीही नसल्याची खातरजमा करणं का गरजेचं आहे, हे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

गारवा शोधत आला साप

सापांना साधारणतः उकाड्याच्या दिवसात गारव्याची गरज असते. जी जागा तुलनेनं थंड असेल, त्या जागी साप आढळतात. उकाड्यानं हैराण होऊन गारवा शोधत आलेला हा साप खुर्चीच्या एका पायातच्या खोबणीत जाऊन बसला होता. हा प्रकार पाहिल्यानंतर कुणाच्याही काळजाचा थरकाप उडेल. खुर्चीच्या पायात एक हिरव्या रंगाचा साप जाऊन बसला होता आणि शांतपणे वेटोळं करून आत बसला होता. 

अधिक वाचा - Viral: चर्चा तर होणारच! इयत्ता दुसरीतील मुलाने अवघ्या १८ मिनिटात पोहून पार केली यमुना नदी 

मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडिओ

आपल्या खुर्चीच्या पायाच्या खोबणीत साप बसल्याचं पाहिल्यावर एकाने मोबाईल कॅमेऱ्यातून त्या सापाचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचं दिसतं. खुर्चीवर बसताना किती काळजी घेणं गरजेचं आहे, हे या व्हिडिओतून दिसून येतं. जर तुम्ही या व्हिडिओतल्यासारखी खुर्ची वापरत असाल, तर प्रत्येकवेळी खुर्चीचे चारही पाय आणि त्यांतील पोकळ जागा तपासून घ्या, असा सल्ला हा व्हिडिओ पाहणारा प्रत्येकजण देत आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी