Social Viral : लहान मुलांचे हे फोटो पाहून तुम्हालाही हसू येईल

व्हायरल झालं जी
Updated May 05, 2019 | 20:26 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Social Viral : ट्विटरवर माउजी नावाच्या एका यूजरने शेअर केलेला एक फोटो सध्या चर्चेचा विषय आहे. या पोस्टमध्ये तीन लहान मुलांचे फोटो आहेत. पारदर्शक एक्सरे मशीनमधल्या मुलांचे हे फोटो पाहून तुम्हालाही हसू येईल.

Kids viral photos
लहान मुलांच्या एक्सरेचे फोटो ट्विटरवर व्हायरल   |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली : भारतात १९६८मध्ये दो कलियां नावाचा सिनेमा आला होता. सिनेमापेक्षा त्यातलं गाणं खूप गाजलं. जे आजही लोकांच्या ओठांवर असतं. 'बच्चे मन के सच्चे, सारी जग के आँख के तारे, ये वो नन्हे फूल हैं जो भगवान को लगते प्यारे'. या गाण्यातील शब्द खूपच वास्तव सांगणार आहेत. मुलं आपल्याला खूप आनंद देतात आणि जर त्यांना एखादी वेदना झाली तर, आपलं हृदय पाघळून जातं. असेच लहान मुलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि हे फोटो आपल्याला सगळी दुःखं वेदना बाजूला ठेवून हसायला लावत आहेत.

लाखो लाईक्स आणि शेअर्स

ट्विटरवर माउजी नावाच्या एका यूजरने शेअर केलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. या पोस्टमध्ये तीन लहान मुलांचे फोटो आहेत. पारदर्शक एक्सरे मशीनमधल्या मुलांचे हे फोटो पाहून तुम्हालाही हसू येईल. माउजीची ही पोस्ट खूप व्हायरलही होऊ लागली आहे. ट्विटर यूजर्स केवळ हे फोटो पाहून हसत नाहीत तर, ते शेअरही करत आहेत. माउजीने फोटो शेअर करताना म्हटले आहे की, मला आत्ताच कळाले आहे की लहान मुलांचा एक्सरे काढायचा असेल तर तो कसा काढला जातो. मला माझे हसू थांबवणे अवघड झाले आहे. तिच्या या ट्विटला एकदोन हजार नव्हे तर, एक लाख वेळा रिट्विट करण्यात आलंय आणि चार लाखहून अधिक जणांनी तिच्या या पोस्टला लाईक केलंय. काही लोकांनी त्यावर कमेंटही केल्या आहेत. मुलांना अशाप्रकारच्या मशीनमध्ये ठेवल्यानंतर त्यांना अवघडल्यासारख होत आहे, अशी प्रतिक्रिया काहींनी दिली आहे.

 

 

एका यूजरने ट्विट करताना म्हटले आहे की, माझी पहिली मुलगी या फोटोमध्ये आहे. जेव्हा आम्ही त्या दवाखान्यात गेलो होतो त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं की, डोळे मिटण्यास सांगितलं होतं. अर्थातच माझी मुलगी खूप घाबरली होती. मी डोळे बंद केले होते. जेव्हा त्यांनी तिला त्या मशीनमध्ये ठेवलं त्याचवेळी मी डोळे उघडले होते. त्यावेळी माझी मुलगी खूप घाबरली होती. मुलांचे फोटो मात्र खूपच मजेशीर आले आहेत. पण, तिथं येणारा माणूस असह्य असतो. वेदनेमध्ये असतो. मुलं तुमच्याकडं अशी पाहत असतात की त्या मशीनमधून बाहेर आल्यानंतर तिच तुम्हाला बेदम मार देतील. अशा प्रकारच्या एक्सरे मशीनला पिग-ओ-स्टैट म्हटले जाते. लहान मुलांचे एक्सरे काढण्यासाठीच याचा वापर केला जातो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Social Viral : लहान मुलांचे हे फोटो पाहून तुम्हालाही हसू येईल Description: Social Viral : ट्विटरवर माउजी नावाच्या एका यूजरने शेअर केलेला एक फोटो सध्या चर्चेचा विषय आहे. या पोस्टमध्ये तीन लहान मुलांचे फोटो आहेत. पारदर्शक एक्सरे मशीनमधल्या मुलांचे हे फोटो पाहून तुम्हालाही हसू येईल.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola