VIDEO: वडिलांना ड्युटीवर जाण्यापासून रोखणाऱ्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल

व्हायरल झालं जी
Updated May 06, 2019 | 21:33 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडिओत एक चिमुरडी आपल्या वडिलांना ड्युटीवर जाण्यापासून रोखत आहे. व्हिडिओमध्ये रडून रडून चिमुरडीचे चांगलेच हाल झालेत.

police video viral
व्हायरल व्हिडिओ  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक चिमुरडी पोलीस कॉन्स्टेबल वडिलांना ड्युटीवर जाण्यापासून रोखत आहे. मुलीचा हा व्हिडिओ हृयाला स्पर्श करून जाणारा असा आहे. आयपीजी भुवनेश्वर अरूण बोथर यांनी ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडिओ १ मिनिट २४ सेकंदाचा असून या व्हिडिओला ३२ हजाराहून अधिक लाईक्स तसेच ३ लाख १९ हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

व्हिडिओमध्ये चिमुरडीने रडून रडून स्वत:चे हाल करून घेतले आहेत. रडत असलेली ही चिमुरडी आपल्या वडिलांचे पाय पकडून त्यांना ड्युटीवर जाण्यापासून रोखत आहे. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार अरूण बोथरा म्हणाले, जेव्हा व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हिडिओ पाहिला तेव्हा काळजाला स्पर्श करून केला. यासोबतच बोथरा यांनी व्हिडिओसोबत ट्वीट करताना म्हटले आहे की, पोलिसांच्या नोकरीतील सर्वात कठीण प्रसंग आहे. 

रिपोर्टनुसार व्हिडिओमधील पोलीस कॉन्स्टेबल मुकेश कुमार(३१) म्हणाले, आशा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जनतेच्या मनात पोलीस अधिकाऱ्यांबाबतची धारणा बदलेल. यासोबतच ते म्हणाले, एक पोलीस कर्मचारीच्या रूपात निवडणूक ड्युटीवर जाण्यास कोणतीच समस्या नाही मात्र जेव्हा लोक पोलिसांबाबत अपमानजनक विधाने करतात तेव्हा त्याचे दु:ख सर्वाधिक होते. 

 

 

हा व्हिडिओ मुकेश यांची पत्नी पूजा सोनीने बनवला आहे. मुकेश म्हणाले, जेव्हा शुक्रवारी सकाळी ड्युटीवर जात असताना मुलगी पलकने जोरात सांगितले की मी घरीच राहिले पाहिजे. माझ्या पत्नीने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ती मला सोडण्यास तयार नव्हतीच. त्यानंतर माझ्या पतीने हे दृश्य कॅनेराज कैद केले. जेव्हा माझ्या मित्रांनी हा व्हिडिओ पाहिला तेव्हा शेअर करण्यास सांगितले आणि हा व्हिडिओ व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर व्हायरल झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
VIDEO: वडिलांना ड्युटीवर जाण्यापासून रोखणाऱ्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल Description: सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडिओत एक चिमुरडी आपल्या वडिलांना ड्युटीवर जाण्यापासून रोखत आहे. व्हिडिओमध्ये रडून रडून चिमुरडीचे चांगलेच हाल झालेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola