VIDEO: दिव्यांग मुलाला जेव्हा मिळाला पाय, आनंदाने लागला नाचू

व्हायरल झालं जी
Updated May 10, 2019 | 19:34 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

स्फोटात हा मुलगा खूपच वाईट पद्धतीने जखमी झाला होता. घटना इतकी भयानक होती की मुलाला यात आपला एक पाय गमवावा लागला होता. या गंभीर स्थितीत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मुलाला आता खोटा पाय लावण

viral video
व्हायरल व्हिडिओ  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: सोशल मीडियावर एका मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू उमटल्याशिवाय राहणार नाही. हे पाहिल्यानंतर बॉलिवूड स्टार्सही हा व्हिडिओ शेअर करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाही. हा व्हिडिओ अफगाणिस्तानी मुलाचा असून ज्याचा डान्स सोशल मीडियावर लोकांना इतका आवडलाय की सगळेच त्याला भरभरून शेअर करत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री गौहर खाननंतर स्वरा भास्करनेही हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

अफगाणिस्तानात एका हल्ल्यात हा चिमुरडा जखमी झाला होता. तो हल्ला इतका भयानक होता की त्याला यात आपला एक पाय गमवावा लागला. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्याला खोटा पाय बसवण्यात आला आहे. खोटा पाय बसवल्यानंतर हा मुलगा इतका खुश झाला की तो आनंदाच्या भरात नाचू लागला. 

 

 

 

 

स्वरा भास्करने ही व्हिडिओ शेअर करताना म्हटलेय, किती गोड मुलगा आहे. अनेकदा ट्विटरवर असे सुंदर क्षणांचे व्हिडिओ पाहायला मिळतात. मी प्रार्थना करते की तुझ्या आयुष्यात असे डान्स करण्याचे प्रसंग वारंवार येवोत. गौहर खानने हा व्हिडिओ अफगाणी महिला रोया मुसावीच्या ट्विटरवर रीट्विट केले होते. गौहरच्या ट्विटवरून समजते की, या मुलाचे नाव अहमद आहे. याला इंटरनॅशनल कमिटी द रेड क्रॉस ऑर्थेपेडिस सेंटरकडून आर्टिफिशियल पाय देण्यात आला आहे. पाय मिळाल्याच्या आनंदात तो लहानगा इतका खुश झाला की आनंदाने नाचू लागला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
VIDEO: दिव्यांग मुलाला जेव्हा मिळाला पाय, आनंदाने लागला नाचू Description: स्फोटात हा मुलगा खूपच वाईट पद्धतीने जखमी झाला होता. घटना इतकी भयानक होती की मुलाला यात आपला एक पाय गमवावा लागला होता. या गंभीर स्थितीत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मुलाला आता खोटा पाय लावण
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola