'या' तरुणीने सोनू सूदकडे केली बॉयफ्रेंड मिळवून देण्याची मागणी, थोड्याच वेळात पूर्ण झाली डिमांड

व्हायरल झालं जी
Updated May 21, 2021 | 21:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

Viral News:एका तरुणीने (Girl) ट्विटरवर सोनू सूदला एक बॉयफ्रेंड (Demand for Boyfriend) मिळवून देण्याची मागणी केली होती. मात्र यातील आश्चर्याचा भाग असा की थोड्याच वेळात या मुलीची मागणी पूर्णदेखील झाली.

Girl demands boyfriend to Sonu Sood
तरुणीची सोनू सूदकडे बॉयफ्रेंडची डिमांड 
थोडं पण कामाचं
  • तरुणीचे सोनू सूदला ट्विट
  • बॉयफ्रेंड मिळवून देण्याची केली मागणी
  • तरुणीची इच्छा थोड्याच वेळात झाली पूर्ण

मुंबई : अभिनेता सोनू सूदने (Actor Sonu Sood)कोरोना काळात (Corona pandemic)अनेकांना मदत केली आहे. अलीकडे अनेक समस्यांसाठी सोनू सूदला ट्विट (Twit)करण्याचे प्रमाण वाढले आहे. असेच एक विचित्र मागणी ट्विटद्वारे सोनू सूदकडे करण्यता आली. एका तरुणीने (Girl) ट्विटरवर सोनू सूदला एक बॉयफ्रेंड (Demand for Boyfriend) मिळवून देण्याची मागणी केली होती. मात्र यातील आश्चर्याचा भाग असा की थोड्याच वेळात या मुलीची मागणी पूर्णदेखील झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) काहीही केले नाही. इतकेच काय सोनू सूदने त्या मुलीला कोणतीही प्रतिक्रियादेखील दिली नाही. 

नेमके काय झाले

नेमके झाले असे की त्या मुलीने सोनू सूदला ट्विट करून बॉयफ्रेंड (post asking for boyfriend) मिळवून देण्याची मागणी केल्यानंतर तिच्या ट्विटला दुसऱ्या एका मुलाने कॉमेंटकरून उत्तर दिले. एका मुलाने त्या मुलीच्या ट्विटवर कॉमेंट करत तिचा बॉयफ्रेंड बनण्याची ऑफर दिली. त्या मुलीने सोनू सूदला ट्विट केलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, 'सर प्लीज एक बॉयफ्रेंड मिळवून द्या.' यानंतर थोड्याच वेळात एका मुलाने कॉमेंट केली की, 'होय मॅडम, सोनू सरांनी मला पाठवले आहे.'

सोनूचे ट्विट

याआधी सोनू सूदने एक ट्विट (Sonu sood twit) केले होते. या ट्विटमध्ये त्याने लिहिले होते की 'मी मातीशी जोडलेला आहे मित्रा. खाली ओढाल तरीही मी जमीनीवर सापडेन.' या पोस्टला कॉमेंट करतच त्या मुलीने सोनू सूदकडे बॉयफ्रेंड मिळवून देण्याची मदत मागितली होती. तिने पोस्ट टाकल्यानंतर थोड्याच वेळात त्या मुलीची मागणी पूर्ण झाली. त्या मुलीची आणि मुलाची ही कॉमेंटबाजी आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होते आहे. 

लॉकडाऊनमध्ये (Lockdown) सोनू सूद लोकांसाठी देवदूत बनला आहे. सोनू सोशल मीडियावर (Social Media) खूप अॅक्टिव्ह असतो. थोड्या थोड्या वेळाने त्याचे ट्विट येत असतात. ट्विटरवर अनेक लोक त्याच्याकडे मदत मागत असतात. सोनूही त्यांना प्रतिसाद देत मदत करत असतो. सोनू सूदच्या ट्विटवर कॉमेंट करूनही लोक त्याच्याकडे मदत मागत असतात.

विद्यार्थ्यांच्या मदतीला सोनू


सोनू सूद विद्यार्थ्यांचा (Students) तारणहार बनला होता. मागील वर्षी मजूरांच्या मदतीला सोनू धावून गेला होता. त्याच्या या कामाचे सर्वत्र मोठे कौतुक झाले होते. त्यानंतर यावर्षी आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा मोठे संकट निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मोठाच प्रश्न निर्माण झाला होता. सोनू सूदने यावर्षी विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवण्याचे काम केले होते. यासाठी सोनूने ट्विटरवर असंख्य पोस्ट आणि व्हिडिओ शेअर केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा सोनू सूद ट्विटरवर ट्रेंड करताना दिसला. सीबीएसई परीक्षा (CBSE Exam) रद्द झाल्यानंतर आयसीएसई आणि स्टेट बोर्डाच्या परीक्षादेखील (State Board exam) रद्द व्हाव्यात यासाठी विद्यार्थी सोनू सूदला पुढाकार घेण्यास सांगत होते. सोशल मीडिया युजर्सचे म्हणणे होते की सोनू सूदने ज्या पद्धतीने सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची मदत केली आहे त्याचप्रमाणे त्याने आता स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांनादेखील मदत करावी. विद्यार्थी सातत्याने सोनू सूदकडे मदत मागत होते आणि सोनूदेखील त्यांच्यासाठी प्रयत्न करताना दिसत होता.

सोनू उभारणार देशातील सर्वात मोठी 'ब्लड बँक'


सोनू सूद मोठ्या प्रमाणावर समाजकार्य करताना दिसतो आहे. त्याने कोरोना संकटाच्या काळात अनेक गरीबांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आपण पाहिली. तसेच अनेक परप्रांतीय मजूरांना मुंबईतून सुरक्षितरित्या त्यांच्या घरी जाण्यासाठी व्यवस्था करुन दिली. या व्यवस्थेचा खर्च सोनू सूदने उचलला होता. त्यानंतर सोनू सूद देशातील सर्वात मोठी 'ब्लड बँक' (Blood bank) उभी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याने ट्वीट करुन ही माहिती दिली होती. देशात अनेक नागरिकांचा मृत्यू वेळेवर रक्त मिळाले नाही म्हणून होतो. या नागरिकांसाठी काम करूया. लोकांचे जीव वाचवण्यासाठी रक्तदान करुया. देशातील सर्वात मोठी 'ब्लड बँक' उभारुया; अशा स्वरुपाची भावना सोनूने व्यक्त केली होती.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी