squirrel was hungry then young man fed it kurkure watch viral video : कुरकुरे, चिप्स हा चटपटीत पदार्थ तब्येतीसाठी किती लाभदायक यावर मतभेद असू शकतात. पण भूक लागली की अनेकांना हे चटपटीत पदार्थ खाणे आवडते. एक तरुण बागेत बाकड्यावर बसून निवांतपणे कुरकुरे खात होता. नंतर जे घडले त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
तरुण कुरकुरे खात होता त्यावेळी एक खारुताई (खार) तरुणाच्या जवळ आली. खारुताईला भरपूर भूक लागली होती आणि ती खाण्याचा पदार्थ शोधत होती. कशी कोण जाणे पण खारुताईला प्रचंड भूक लागली असल्याची जाणीव तरुणाला झाली. त्याने खारुताईला कुरकुरे दिले. विशेष म्हणजे खारुताईने लगेच कुरकुरे घेतले आणि खाण्यास सुरुवात केली.
फाॅरेनच्या सूनेला रानात काम करताना बघून सासूला आवरेना हसू; एकदा पहाच Viral Video...
Viral Video : भन्नाट बॅलन्स, डोक्यावर डोकं टेकवून दोघे असे चढले पायऱ्या
थोड्याच वेळात खारुताई आणि तरुण यांची गट्टी जमली. खारुताई बेधडक तरुणाच्या अगदी जवळ जाऊन कुरकुरे घेऊन खाऊ लागली. एक-दोन वेळा जीन्सचा आधार घेऊन खारुताई तरुणाच्या पायांवर जाऊन उभी राहिली आणि कुरकुरे खाऊ लागली. अल्पावधीत खारुताई आणि कुरकुरे देणारा तरुण यांच्यात विश्वासाचे अनोखे नाते निर्माण झाले. यानंतर खारुताईच्या मैत्रीणी पण कुरकुरे खाण्यासाठी तरुणाजवळ आल्या. व्हिडीओत तरुण चार-पाच खारुताईंना (खारींना) कुरकुरे खाऊ घालताना दिसत आहे.
तरुणाच्या हातून कुरकुरे घेऊन खाणाऱ्या खारुताईंचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकांनी हा व्हिडीओ बघितला आहे. व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. अनेकांनी खारुताईंना खाऊ घालणाऱ्या तरुणाचे कौतुक केले आहे.