१२ वर्षीय मुलाचा तरूणीवर सेक्स चॅटसाठी दबाव, दिली ही धमकी 

एका १२ वर्षीय  मुलाने २१ वर्षीय तरूणीला सेक्स चॅट करण्यासाठी दबाव टाकला आहे. तरूणीने असे करण्यास नकार दिला तेव्हा त्याने तिचे टेलीग्राम अकाऊंट हॅक करून बदनामी करण्याची धमकी दिली आहे.

story 12 year old boy pressure girl for sex chat in online study group threatens to threat telegram account ghaziabad locker room crime news in marathi cri12
१२ वर्षीय मुलाचा तरूणीवर सेक्स चॅटसाठी दबाव, दिली ही धमकी   |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • लॉकर रूम अंतर्गत गाजियाबादमध्ये नवे सायबर बुलिंगचे प्रकरण समोर आले आहे.
  • येथील एका १२ वर्षीय  मुलाने २१ वर्षीय तरूणीला सेक्स चॅट करण्यासाठी दबाव टाकला आहे.
  • तरूणीने असे करण्यास नकार दिला तेव्हा त्याने तिचे टेलीग्राम अकाऊंट हॅक करून बदनामी करण्याची धमकी दिली आहे.

गाजियाबाद :  लॉकर रूम अंतर्गत गाजियाबादमध्ये नवे सायबर बुलिंगचे प्रकरण समोर आले आहे. येथील एका १२ वर्षीय  मुलाने २१ वर्षीय तरूणीला सेक्स चॅट करण्यासाठी दबाव टाकला आहे. तरूणीने असे करण्यास नकार दिला तेव्हा त्याने तिचे टेलीग्राम अकाऊंट हॅक करून बदनामी करण्याची धमकी दिली आहे. दोघे एका स्टडी ग्रुपमध्ये कॉमन मेंबर आहेत. तरूणीने कुटुंबियांकडे ही तक्रार केली त्यानंतर हे प्रकरण पोलिसांमध्ये गेले, आता पोलीस या प्रकरणात तक्रार नोंदवू चौकशी करीत आहे. 

पीडित तरूणी स्वतः चालवते ऑनलाइन क्लास 

पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत विद्यार्थीनीने सांगितले ऑनलाइन अभ्यासांतर्गत शिक्षणासाठी ती आपल्या शिक्षकांसाठी टेलीग्राम ग्रुपच्या माध्यमातून जोडली गेली आहे. तसेच ती स्वतः ऑनलाइन क्लास घेते. विद्यार्थीनीने सांगितले की सात मे रोजी एका मुलाने तिला वैयक्तिक मेसेज पाठवला. त्याने सांगितले की तो गरीब आहे. शिक्षण घेऊ इच्छितो. यानंतर आरोपीने तरूणीला निवेदन केले तिला आपल्या ग्रुपमध्ये अॅड करावे. विद्यार्थीनीने त्याला त्या ग्रुपमध्ये अॅड केले. पण आरोपीने १७ मेपासून अश्लिल मेसेज पाठविणे सुरू केले. याला तरुणीने विरोध केला. तेव्हा आरोपीने तिला सेक्स चॅट करण्यास सांगितले. त्यावर तरुणीने नकार दिला. त्यावेळी तिचे टेलीग्राम अॅप हॅक करून तिच्या प्रोफाईलचा  दुरुपयोग करण्याची धमकी दिली. हे जर नको असेल तर आरोपीने विद्यार्थीनीकडे पैशांची मागणी केली. 

सतत देत होता त्रास 

आरोपी विद्यार्थी तरूणीला सतत त्रास देत होता. अखेर तरूणीने ही गोष्ट आपल्या कुटुंबियांना सांगितली. कुटुंबियांनी याची तक्रार पोलिसांमध्ये दिली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. 

पोलीस काय म्हणतात..

यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की या प्रकरणात एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गरज पडली तर आयटी अॅक्ट अंतर्गतही गुन्हा नोंदविण्यात येईल. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी