धक्कादायक! या धार्मिक स्थळावर जोडप्याने बनवला सेक्स व्हिडिओ, केला पॉर्न साइटवर अपलोड 

म्यानमारचं पॅगोडा आणि मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेले धार्मिक स्थळ बागान येथे इटलीच्या एका जोडप्याने सेक्स केला आणि त्याचा व्हिडिओ बनवला. ते इतक्यावर थांबले नाही. हा व्हिडिओ त्यांनी एका पॉर्न साइटवर अपलोडही केला.

story adult video shot italian couple at myanmar holy site bagan angers citizens sex news in marathi tviral 12
धक्कादायक! या धार्मिक स्थळावर जोडप्याने बनवला सेक्स व्हिडिओ, केला पॉर्न साइटवर अपलोड   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • म्यानमारच्या पवित्र स्थळावर जाऊन इटलीच्या जोडप्याचा प्रताप
  • पॅगोडाच्या जवळ बनवला सेक्स व्हिडिओ
  • सेक्स व्हिडिओ बनवून टाकला पॉर्न साइटवर

नायपिटा :  म्यानमारचं पॅगोडा आणि मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेले धार्मिक स्थळ बागान येथे इटलीच्या एका जोडप्याने सेक्स केला आणि त्याचा व्हिडिओ बनवला. ते इतक्यावर थांबले नाही. हा व्हिडिओ त्यांनी एका पॉर्न साइटवर अपलोडही केला. बागान या ठिकाणी हजारो भाविक येत असतात. परंतु या धार्मिक स्थळावर एका जोडप्यानं सेक्स व्हिडीओ तयार केल्यानं येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.  ९ व्या आणि १३ व्या शतकातील बनलेल्या ३ हजार पॅगोडा आणि मंदिरांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. युनोस्कोने येथील अनेक साईटला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला आहे. 

आयएनएसच्या रिपोर्टनुसार, इटलीच्या दाम्पत्यानं म्यानमारच्या पवित्र स्थळ असलेल्या बागानमध्ये 12 मिनिटांचा सेक्स करतानाचा व्हिडीओ तयार केला आहे. त्यानंतर हा चर्चेत असलेला व्हिडीओ पॉर्न हब डॉट कॉम या साइटवर अपलोड केला. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ धार्मिक स्थळावर चित्रीत करण्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे या जोडप्यानं हे सगळं प्राचीन पॅगोड्यात रेकॉर्ड केलं आहे.

व्हिडीओसंदर्भात जेव्हा स्थानिकांना समजलं, त्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. स्थानिकांनी व्हिडीओ पाहिला आणि याची तक्रार करण्याची मागणी केली. रिपोर्टनुसार, बागानमधल्या एका नागरिकानं सांगितलं की, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आम्हाला फार दुःख झालं. धार्मिक इमारत आणि पॅगोड्यामध्ये संबंध प्रस्थापित करणं अनुचित आहे. त्यात आमचा धर्म, संस्कृती आणि इतिहासाचा अनमोल वारसा असलेल्या ठिकाणी हे सर्व करण्यात आलं आहे.

स्थानिक न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, या धार्मिक स्थळावर स्थानिकांसह परदेशी नागरिकांना शॉर्ट्स किंवा तोकडे कपडे घालून फिरण्यास मनाई आहे. पॅगोडा, मंदिर आणि धार्मिक इमारतीत चुकीचे कपडे घालणं पूर्णतः प्रतिबंधित आहे. म्यानमारची धार्मिक इमारत आणि परिसरात उघड्यावर किस घेण्यासही मज्जाव आहे. सोशल मीडियावरही लोक या प्रकरणात टीकात्मक प्रतिक्रिया देत आहे. .

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...