Whatsapp वर सेक्स रॅकेट चालविणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक 

लालपूर पोलिसांनी व्हॉट्सअॅपवर सेक्स रॅकेट चालविणाऱ्या टोळीचा म्होरक्या जोसेफ याला अटक केली आहे. सध्या आरोपीची पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू आहे. जोसेफ हा हिस्ट्री शिटर असून तो यापूर्वीही जेलमध्ये गेलेला होता.

story gang master who runs sex racket arrested on whatsapp crime news in marathi
Whatsapp वर सेक्स रॅकेट चालविणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक   |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  •  लालपूर पोलिसांनी व्हॉट्सअॅपवर सेक्स रॅकेट चालविणाऱ्या टोळीचा म्होरक्या जोसेफ याला अटक केली आहे.
  • सेफ हा हिस्ट्री शिटर असून तो यापूर्वीही जेलमध्ये गेलेला होता.
  • व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तो लोकांशी संपर्क साधत होता. तरुणींचे फोटो ग्राहकाला पाठवत असे.

रांची : झारखंडच्या लालपूर पोलिसांनी व्हॉट्सअॅपवर सेक्स रॅकेट चालविणाऱ्या टोळीचा म्होरक्या जोसेफ याला अटक केली आहे. सध्या आरोपीची पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू आहे. जोसेफ हा हिस्ट्री शिटर असून तो यापूर्वीही जेलमध्ये गेलेला होता. जोसेफ हा खूप चलाख आणि धूर्त होता. तो आपले हे सेक्स रॅकेट खूप पद्धतशीरपणे कार्यान्वीत करत होता. कोलकता आणि ओडिशा येथून तरूणी आणि अल्पवयीन मुलींना विकत घेऊन हे सेक्स रॅकेट चालवत होता. 

लालपूर पोलिस ठाण्याचे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना या संदर्भात एक सूचना मिळाली होती. मिळालेल्या टीमनुसार आरोपी एका घरात एका तरुणीला घेऊन येणार होता. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी रचलेल्या जाळ्यात आरोपी अलगद पकडला गेला. पोलीसांची टीम घटनास्थळी पोहचली तेव्हा एक तरूणी खोलीत होती. तर आरोपी बाहेर बसला होता. 

पोलीसांनी त्या पकडले. त्यावेळी सुरूवातीच्या चौकशीत आरोपीने आपले नाव नाही सांगितले. मग पोलिसांनी आपला खाक्या दाखवला. त्यानंतर आरोपीने घडाघडा आपली सर्व माहिती दिली आणि या सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला. 

आरोपीने आपण कशा पद्धतीने ऑपरेट करत होतो याची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. त्याने सांगितले की, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तो लोकांशी संपर्क साधत होता. तरुणींचे फोटो ग्राहकाला पाठवत असे. त्यानुसार आवडलेली तरुणी त्या ग्राहकापर्यंत पोहचविण्यात येत होती. यासाठी आरोपी लोकांकडून एक मोठी रक्कम वसूल करायचा. त्यातील काही भाग हा तरुणीला देत असते. 

जोसेफची सध्या चौकशी सुरू आहे. तसेच त्याच्या या सेक्स रॅकेटमध्ये त्याला कोण मदत करत आहे, याचाही तपास सुरू आहे. पोलिसांनी या संदर्भात अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी