Getting Job in Google after rejection : नवी दिल्ली : जगभरात नोकऱ्या मिळवण्यासाठी लोक कष्ट घेत असतात. तर दुसरीकडे नोकरदार लोकही आपले काम पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत असतात. याशिवाय लोक प्रमोशनसाठी, मोठ्या पगारासाठी कंपन्याही बदलतात. त्यातच ती कंपनी गुगल असेल तर मग विचारूच नका. पण कल्पना करा की एका व्यक्तीला एकाच कंपनीतून 39 वेळा नाकारण्यात आले आणि शेवटी 40व्यांदा त्याच कंपनीत नोकरी मिळाली तर ते किती धक्कादायक असेल. असेच एक प्रकरण अमेरिकेत समोर आले आहे. या तरुणाची ही कहाणी व्हायरल झाली आहे. सोशल मीडिया युजर्समध्ये याची जोरदार चर्चा आहे. याला जिद्द म्हणायचे की वेडेपण यावर चर्चा होते आहे. (Story of a person getting job at Google after 39 rejections goes viral)
अधिक वाचा : डाॅक्टरांनाही ठरवलं खोटं! कधीच आई होऊ न शकणारी अभिनेत्री चौथ्यांदा प्रेग्नेंट
हे प्रकरण अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोचे आहे. प्रसार माध्यमांमधून आलेल्या माहितीनुसार, टायलर कोहेन असे या व्यक्तीचे नाव आहे. या व्यक्तीने ठरवले होते की, काहीही झाले तरी त्याला एकदा गुगलमध्ये नोकरी (Job in Google)करायची आहे. त्यासाठी त्याने अनेकवेळा अर्ज पाठवला, मात्र तो फेटाळण्यात आला. त्याला वाटले की हे पहिल्यांदा घडले नाही, आता पुढच्या वेळी होईल. पण तरीही तसे झाले नाही. वारंवार रिजेक्ट होऊनही तो गुगलमध्ये अर्ज करत राहिला.
अधिक वाचा : जगातील सर्वात स्वस्त मोबाईल डेटा देणाऱ्या देशांमध्ये भारत कितवा?
आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक-दोनदा नव्हे तर तब्बल 39 वेळा त्या व्यक्तीला नकार देण्यात आला. परंतु प्रत्येक वेळी नाकारल्यानंतर तो पुन्हा अर्ज करत राहिला. अखेरीस, 40 व्यांदा अर्ज केल्यानंतर, Google ने त्याचा अर्ज स्वीकारला आणि त्याची अंतिम निवड झाली. गुगलने त्याला कामावर घेतले आहे. एवढेच नाही तर त्या व्यक्तीने गुगलला पाठवलेल्या ईमेलचा स्क्रीनशॉटही त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
त्यामध्ये त्या व्यक्तीने ऑगस्ट 2019 मध्ये गुगलमध्ये पहिल्यांदा अर्ज केल्याचे दिसत आहे. त्यानंतर तो सतत अर्ज पाठवत होते मात्र त्याची निराशा होत होती. 11 मे 2022 रोजी त्याने 39व्यांदा अर्ज केला तेव्हाही तो निराश होता. अखेर १९ जुलै रोजी त्यांनी 40व्यांदा अर्ज केला. यावेळी मात्र गुगलने त्याची निवड करत त्याला काम दिले.
अधिक वाचा : Bike मध्ये पेट्रोल कमी होतं म्हणून पोलिसांनी फाडली पावती? सोशल मीडियात व्हायरल झाला फोटो
त्या व्यक्तीची ही कहाणी जगभर व्हायरल (Viral) होत आहे. जेव्हा त्या व्यक्तीने आपल्या सोशल मीडिया पोस्टवर ही माहिती दिली तेव्हा लोकांनी त्याला खूप प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर खुद्द गुगलनेही यावर भाष्य केले आहे. गुगलने लिहिलंय की किती प्रवास झाला! खरं तर थोडा वेळ गेला असता. दुसरीकडे, या व्यक्तीचे म्हणणे आहे की हट्टीपणा आणि वेडेपणा यात एक बारीक रेषा आहे. माझ्याकडे दोनपैकी कोणते हे शोधण्याचा मी प्रयत्न करतो आहे.