Viral Video : मगर आणि कासवाची Viral झालेली गोष्ट

story of the crocodile and the turtle went viral : मगर आणि कासवाची गोष्ट व्हायरल होत आहे. ही व्हायरल होत असलेली गोष्ट म्हणजे खरं तर एक व्हायरल होत असलेला व्हिडीओ आहे.

story of the crocodile and the turtle went viral
Viral Video : मगर आणि कासवाची Viral झालेली गोष्ट  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Viral Video : मगर आणि कासवाची Viral झालेली गोष्ट
  • व्हायरल होत असलेली गोष्ट म्हणजे खरं तर एक व्हायरल होत असलेला व्हिडीओ
  • व्हिडीओत मगरीच्या जबड्यात सापडलेले कासव दिसत आहे

story of the crocodile and the turtle went viral : ससा आणि कासवाची गोष्ट अनेकांनी लहापणी वाचली, ऐकली आणि व्हिडीओरुपात बघितली असेल. या गोष्टीत वेगाने पळणारा ससा थकतो आणि आराम करण्यासाठी थांबतो. झोपी जातो. या उलट कासव सावकाश पण निश्चित अशा गतीने पुढे सरकत राहते आणि स्पर्धा जिंकते. आता  मगर आणि कासवाची गोष्ट व्हायरल होत आहे. ही व्हायरल होत असलेली गोष्ट म्हणजे खरं तर एक व्हायरल होत असलेला व्हिडीओ आहे. या व्हिडीओत मगरीच्या जबड्यात सापडलेले कासव दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Ocean Life (@oceanlife.4u)

व्हायरल व्हिडीओत कासव मगरीच्या जबड्यात दिसत आहे. कासवाची पाठ टणक असते. ही टणक पाठ कासवासाठी फायद्याची ठरणार की मगर या पाठीचा तुकडा पाडणार एवढाच प्रश्न उरला असतो. पुढील काही सेकंदात चित्र स्पष्ट होणार यामुळे व्हिडीओ बघणारे श्वास रोखून पुढे काय होणार हे बघू लागतात....

मगर एक-दोन वेळा जबडा बंद करून कासवाला चावण्याचा प्रयत्न करताना दिसते. या दरम्यान मगरीच्या जबड्यातून छोटी उडी मारून कासव जबड्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू करते. मगर आणि कासव यांच्यातील या संघर्षात आश्चर्यकारकरित्या कासव मगरीच्या जबड्यातून बाहेर पडते. 

Viral Video : साडी नेसून जिममध्ये व्यायाम करणारी 56 वर्षांची महिला

'या' बागेतून उघडते मृत्यूचे दार, बागेत गेलेला माणूस जीवंत परतत नाही

बहुधा कासवाच्या पायांना दुखापत झाली असावी. कारण मगरीच्या जबड्यातून बाहेर आल्यानंतर कासव लंगडत लंगडत पुढे सरकू लागते. विशेष म्हणजे जबड्यातून निसटले तरी कासवावर पुन्हा हल्ला करण्याची मगरीची इच्छाच दिसत नाही. टणक पाठीचा प्राणी चावून खाणे कठीण वाटल्यामुळे असेल पण मगर पुन्हा कासवावर हल्ला करण्याचा विचार सोडून देते. कासवाचा जीव वाचतो. कासव लंगडत लंगडत पाण्याच्या दिशेने सरकू लागते. 

रेशनकार्डमध्ये दत्ता ऐवजी नाव छापलं कुत्ता; अधिकाऱ्यासमोर दिसताच लागला भुंकायला [Video]

मगर आणि कासवाचा हा व्हिडीओ oceanlife.4u या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अपलोड झाला आहे. हा व्हिडीओ हजारो युझरनी बघितला आहे. अनेक इन्स्टाग्राम युझरनी व्हिडीओ बघून त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी