रात्री दोन वाजता ठोकायचा दरवाजा, नंतर फेकायचा कंडोमचे पॅकेट 

बंगळुरूमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी एका व्यक्तीने एका महिलेच्या घरी मध्यरात्री कंडोमचे पॅकेट फेकणे सुरू केले. इतकेच नाही तर रात्री दोन वाजता या महिलेच्या घराचा दरवाजा ठोकला. 

stranger throws condom packets into a woman house bengaluru crime news in marathi tstg 7
रात्री दोन वाजता ठोकायचा दरवाजा, नंतर फेकायचा कंडोमचे पॅकेट   |  फोटो सौजन्य: Thinkstock

बंगळुरू : बंगळुरूमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी एका व्यक्तीने एका महिलेच्या घरी मध्यरात्री कंडोमचे पॅकेट फेकणे सुरू केले. इतकेच नाही तर रात्री दोन वाजता या महिलेच्या घराचा दरवाजा ठोकला. 

पुत्तेनहाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या महिलेने एका अज्ञान व्यक्ती विरूद्ध तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार एका व्यक्तीने रात्री दोन वाजता महिलेच्या घराचा दरवाजा ठोठावला. महिलेने दरवाजा उघडला नाही तर त्याने खिडकीतून कंडोमचे पॅकेट घरात फेकून तो पळून गेला. 

तक्रारीनुसार मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घराच्या दरवाजावर कोणी तरी आल्याचे मला भास झाला. त्या व्यक्तीने घराचा दरवाजा ठोठावला. दरवाजा मी उघडला नाही तर त्याने कशी तरी खिडकी उघडली आणि घरातील स्वीच बोर्डवरील लाइट लावली. त्यानंतर तो बराच वेळ लाइट चालू-बंद करत होता. त्यामुळे मला खूप भीती वाटल्याचे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले. 

यानंतर महिलेने १०० क्रमांवर फोन करून पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच अज्ञात व्यक्तीने तेथून पळ काढला. पण महिलेने सकाळी पाहिले तर हॉलमध्ये कंडोमचे पॅकेट पडलेले होते. 

महिलेने अंदाज लावला की अज्ञात व्यक्ती घऱाची खिडकी उघडण्यात यशस्वी झाला होता. त्यामुळे या ठिकाणाहूनच त्याने हॉलमध्ये कंडोमचे पॅकेट फेकले असावे. 

पोलीस आरोपीचा शोध घेत असून सीसीटीव्ही कॅमऱ्याचे फूटेज खंगाळण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. तसेच तो अज्ञात व्यक्ती कोण याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.  महिला अजूनही दहशतीत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी