Viral Video: मॅडमच्या शेजारी उभा राहून बोलू लागला कविता अन् तितक्यात निसटली पँट

Viral Video: सोशल मीडियात एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक विद्यार्थी हा स्टेजवर मॅडमच्या शेजारी उभा राहून कविता बोलत होता आणि तितक्यात...

student pant slip while speaking poem on stage video goes viral
Viral Video: मॅडमच्या शेजारी उभा राहून बोलू लागला कविता अन् तितक्यात निसटली पँट  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियात व्हायरल होतोय व्हिडिओ
  • मॅडमच्या शेजारी उभा राहून बोलत होता कविता
  • कविता बोलता बोलता विद्यार्थ्याची निसटली पँट

Student pant slip video viral: सोशल मीडियात विविध प्रकारचे व्हिडिओ आणि फोटोज दररोज व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडिओ इतकी मजेशीर असतात की हसू आवरत नाही. सध्या सोशल मीडियात असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत दिसत आहे की, एक विद्यार्थी आपल्या मॅडमच्या शेजारी उभा राहून कविता गात आहे. (student pant slip while speaking poem on stage video goes viral)

हा विद्यार्थी 'मछली जल की राणी है' गात असतानाच असे काही होते की, त्यानंतर उपस्थितांना हसू आवरत नाही. कारण, हा विद्यार्थी कविता गात असताना त्याची पँट अचानक निसटते. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात अपलोड करण्यात आला असून तो प्रचंड व्हायरल होत आहे. इतकेच नाही तर त्यावर अनेक कमेंट्स सुद्धा येत आहेत.

व्हिडिओ पाहून हसू अनावर

व्हिडिओत पाहू शकतो की, एक मुलगा हाफ पँट आणि हाफ टी-शर्ट परिधान करुन स्टेजवर पोहोचतो. तेथे त्याच्या शेजारी मॅडम उभ्या आहेत. हा व्हिडिओ शाळेतील एका कार्यक्रमाचा असल्याचं दिसून येत आहे. स्टेजवर पोहोचल्यावर हा विद्यार्थी कविता बोलू लागतो. माईक हातात घेऊन विद्यार्थी 'मछली जल की राणी है' गाण्यास सुरुवात करतो तितक्यात त्याची पँट निसटते. हे पाहून तेथे उपस्थित असलेल्यांमध्ये एकच हशा पिकतो.

हे पण वाचा : एकांतात असाल तरच पाहा या बोल्ड वेब सीरिज​

हा व्हिडिओ butterfly_mahi नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूव्ज मिळाले आहेत. हा व्हिडिओ एखाद्या शाळेतील असल्याचं बोललं जात आहे. अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडिओ खूपच व्हायरल होताना दिसून येत आहे. ज्या प्रमाणे परफॉर्म करताना विद्यार्थ्याची पँट निसटते ते पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी