Viral: चक्क रेल्वेस्टेशनवर विद्यार्थी करतात IAS परीक्षेची तयारी; जाणून घ्या यामागील खास कारण

व्हायरल झालं जी
Updated Jun 18, 2022 | 11:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sasaram Railway Station । असे म्हणतात की ज्याला अभ्यासाची आवड आहे तो कोणत्याही परिस्थितीत अभ्यास करून त्याला हवे ते ध्येय गाठू शकतो. तुम्ही अशा गोष्टी अनेक महापुरुषांबद्दल ऐकल्या असतील, ज्यांनी स्ट्रीट लाईट किंवा रेल्वे स्टेशनच्या दिव्यावर अभ्यास करून यश संपादन केले आहे.

Students prepare for IAS exam at railway station, Find out the special reason behind this
...म्हणून चक्क रेल्वेस्टेशनवर विद्यार्थी करतात IAS ची तयारी   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • चक्क रेल्वेस्टेशनवर विद्यार्थी करतात IAS परीक्षेची तयारी.
  • सध्या सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल होत आहे.
  • हा फोटो बिहारमधील सासाराम रेल्वे स्थानकावरील आहे.

Sasaram Railway Station । नवी दिल्ली : असे म्हणतात की ज्याला अभ्यासाची आवड आहे तो कोणत्याही परिस्थितीत अभ्यास करून त्याला हवे ते ध्येय गाठू शकतो. तुम्ही अशा गोष्टी अनेक महापुरुषांबद्दल ऐकल्या असतील, ज्यांनी स्ट्रीट लाईट किंवा रेल्वे स्टेशनच्या दिव्यावर अभ्यास करून यश संपादन केले आहे. देशाचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम हे एक याचे उत्तम उदाहरण आहे. ते घरच्यांचे पोट भरण्यासाठी वर्तमानपत्र विकायचे आणि त्यांनी चांगला अभ्यास करून देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली. सध्या सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विद्यार्थी आयएएस परीक्षेची तयारी रेल्वे स्टेशनवर करत आहेत. (Students prepare for IAS exam at railway station,  Find out the special reason behind this). 

अधिक वाचा : गुरूपौर्णिमा कधी आहे? येथे पाहा योग्य तारीख आणि पूजेची पद्धत

दरम्यान, हा फोटो बिहारमधील सासाराम रेल्वे स्थानकावरील आहे. या फोटोमध्ये शेकडो विद्यार्थी प्लॅटफॉर्मवर बसून एकत्र अभ्यास करत असल्याचे पाहायला मिळत आहे. रेल्वेचे अधिकारी अनंत रुपनागुडी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी फोटोची माहितीही शेअर केली आहे. त्यांनी सांगितले की, बिहारमधील सासाराम रेल्वे स्थानकावर दररोज सकाळी आणि संध्याकाळी शेकडो विद्यार्थी जमतात. दोन तास हे विद्यार्थी प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक दोनचे रूपांतर शाळेमध्ये करतात. 

रेल्वे अधिकाऱ्याने शेअर केला फोटो

माहिती शेअर करताना एका रेल्वे अधिकाऱ्याने लिहिले आहे की, "येथे नागरी सेवा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, IIT आणि IIM प्रवेश परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी एकत्र अभ्यास करतात." यासोबतच दररोज शेकडो विद्यार्थी येथे सकाळ संध्याकाळी अभ्यासासाठी का जमतात, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येण्याचे मुख्य कारण म्हणजे इथे २४ तास वीज उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा येत नाही. माहितीनुसार २००२ पासून इथे विद्यार्थी अभ्यासासाठी येत आहेत. 

लक्षणीय बाब म्हणजे रेल्वे स्टेशनवर नेहमी वीज असते. यामुळे २००२ साली प्रथमच काही विद्यार्थी या स्थानकात येऊन अभ्यास करू लागले. त्यानंतर हे अभ्यासाचे चक्र सुरूच राहिले. आज २० वर्षांनंतरही या रेल्वे स्थानकावर दररोज शेकडो विद्यार्थी येऊन अभ्यास करतात. लक्षणीय बाब म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की सासाराम रेल्वे स्थानक एखाद्या कोचिंग संस्थेसारखी झाली आहे. माहितीनुसार, येथे शिकण्यासाठी येणारे बहुतांश विद्यार्थी हे रोहतास जिल्ह्यातून येतात. तिथल्या गावांमध्ये विजेची फारशी सोय नाही.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी