मुक्याने जीवाने दाखवली माणुसकी, जीवाची पर्वा न करता हत्तीने वाचवला माहूताचा जीव!

Elephant saves mahout life video: सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये बराच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका हत्तीने आपल्या जीवाची बाजी लावून माहूताचा जीव वाचवल्याचं पाहायला मिळत आहे.

suddenly flood came in river mahout started drowning but elephant saved his life
स्वत:च्या जीवाची पर्वा न करता हत्तीने वाचवला माहूताचा जीव! 
थोडं पण कामाचं
  • धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
  • जीवाची पर्वा न करता हत्तीने वाचवला मालकाचा जीव
  • हत्तीने कसा वाचवला जीव पाहा व्हायरल Video

Elephant saves mahout life video: महाराष्ट्र, गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटकसह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. दुसरीकडे संततधार पावसामुळे बिहारच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील नद्यांच्या पाणी पातळीत अचानक वाढ होत आहे. त्यामुळे तेथे राहणाऱ्या व तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.  याच सगळ्यात बिहारमधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हत्तीच्या पाठीवर बसून गंगा नदी पार करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. दरम्यान, हत्ती पूर्णपणे पाण्यात बुडताना दिसतोय, पण तो आपला जीव धोक्यात घालून शेवटी त्याच्या मालकाला सुरक्षित किनाऱ्यावर घेऊन जात असल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. 

अधिक वाचा: Landslide in heavy rain: पर्यटकांच्या गाडीवर कोसळली दरड; हिमालच प्रदेशातील घटनेचा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपलाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. ही घटना वैशाली जिल्ह्यातील राघोपूर भागातील आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हत्ती आपल्या मालकाचा जीव वाचवण्यासाठी रुस्तमपूर घाट ते पाटणा केथुकी घाट दरम्यान सुमारे एक किलोमीटरपर्यंत पोहत गेला. 

अचानक गंगा नदीत हत्ती बुडू लागला

स्थानिकानी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, मंगळवारी एक व्यक्ती हत्तीवर बसून गंगा नदी पार करत होता. पण अचानक नदीचं पाणी वाढलं. यानंतर दोघेही नदीत अडकले. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो माणूस हत्तीचा कान धरून बसला आहे. यावेळी त्या व्यक्तीची जीवन-मरणाशी झुंज सुरु होती. यावेळी, हत्ती देखील जवळजवळ बुडाल्यांचं पाहायला मिळत आहे.

मात्र, असं असलं तरीही हत्ती शेवटपर्यंत प्रयत्न सोडत नाही आणि तो शेवटपर्यंत त्याच्या आणि त्याच्या मालकाचा जीव वाचवतो. या व्हिडिओमध्ये हत्ती आपल्या मालकाला किनाऱ्यापर्यंत आणून सोडत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अधिक वाचा: VIDEO : ट्रक चालकानं नागिनचा हॉर्न मारताच, तरुणांच्या अंगात संचारला वरतीत लोळणारा नाग; रस्त्यात जीवघेणा डान्स

व्हिडिओमध्ये हत्ती पूर्णपणे पाण्यात बुडाल्याचे दिसत आहे. व्हिडिओ पाहून असे दिसते की तो आता बुडणार आणि तो काही त्याच्या मालकाला जीव वाचवू  शकणार नाही. तथापि, हत्ती शेवटपर्यंत हार मानत नाही आणि आपल्या मालकाला नदीच्या काठावर घेऊन जातो. हा व्हिडिओ संतोष सागर नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर इंटरनेट यूजर्संने हत्तीचे कौतुक केलं आहे. एका यूजरने लिहिले की, संकटातही प्राणी माणसाची साथ सोडत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी