Swiggy: 'या' व्यक्तीने स्विगीवर केली तब्बल 75378 रुपयांची ऑर्डर; तर दुसरी दुसरी सर्वात मोठी ऑर्डर दिली पुणेकराने

Swiggy's highest single order: घरी बसल्या-बसल्या मोबाइल अ‍ॅपवरुन तुम्ही खाण्याचे पदार्थ मागवत असाल. तुम्ही आजपर्यंत दोन-तीन हजाराची ऑर्डर दिली असेल पण एका ग्राहकाने स्विगीवर तब्बल 75 हजारांची ऑर्डर दिली आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो (Photo: iStock) 
थोडं पण कामाचं
  • फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने आपला वार्षिक ट्रेड रिपोर्ट How India Swiggy'D 2022 प्रसिद्ध केला
  • या रिपोर्टनुसार, या वर्षी ग्राहकांनी सर्वाधिक बिर्याणीची ऑर्डर दिली 
  • बंगळुरूतील एका व्यक्तीने चक्क 75378 रुपयांची दिली ऑर्डर

Swiggy highest order in year 2022: फूड डिलिव्हरी अ‍ॅप Swiggy वरुन तुम्ही खाद्यपदार्थ ऑर्डर करत असाल. ज्याचं बिल साधारणत: दोन-एक हजाराच्या आतच असेल. पण एका व्यक्तीने अशी काही ऑर्डर दिली की ज्याचं बिल 75 हजारांहून अधिक झालं. 2022 या वर्षातील स्विगीवरील ही सर्वात मोठी ऑर्डर ठरली आहे. (swiggy customer order highest single order this year of rs 75378 in bengaluru second is from pune maharashtra read details in marathi)

पुण्यातील ग्राहकाकडून बर्गर्सची ऑर्डर

पुण्यातील एका व्यक्तीने आपल्या टीमसाठी स्विगीवरुन 71229 रुपयांचे बर्गर आणि फ्राईज ऑर्डर केले. ही ऑर्डर स्विगी या फूड डिलिव्हरी अ‍ॅपवरील 2022 या वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑर्डर ठरली.

हे पण वाचा : कोणतीही व्यक्ती अविवाहित का असते? जाणून घ्या कोणती रास काय सांगते

बंगळुरूतून सर्वात मोठी ऑर्डर

तर स्विगीवर या वर्षी सर्वात मोठी ऑर्डर आली ती म्हणजे बंगळुरू येथून... बंगळुरू येथील एका व्यक्तीने दिवाळीत तब्बल 75378 रुपयांच्या खाद्यपदार्थांची ऑर्डर दिली होती. गुरुवारी स्विगीने आपला वार्षिक ट्रेड रिपोर्ट हाऊ इंडिया स्विगी'डी 2022 (HOW INDIA SIGGY'D 2022) प्रसिद्ध केला. या रिपोर्टमध्ये हा खुलासा झाला आहे.

हे पण वाचा : Pune: वीकेंड सेलिब्रेट करण्यासाठी पुण्याजवळील प्रसिद्ध ठिकाणे

सर्वाधिक ऑर्डर बिर्याणीची

भारतात 2022 या वर्षात स्विगीवर ग्राहकांनी सर्वाधिक बिर्याणीची ऑर्डर दिली आहे. हे सलग सातवे वर्ष आहे ज्यात सर्वाधिक ऑर्डर ही बिर्याणीची आहे. या वर्षीच्या ऑर्डर्सनुसार, प्रत्येक मिनिटाला बिर्याणीच्या 137 ऑर्डर्स प्राप्त झाल्या. याच प्रकारे प्रत्येक सेकंदाला 2.28 बिर्याणीच्या ऑर्डर्स आल्या. हा एक नवा रेकॉर्ड आहे.

या वर्षी स्विगीवर सर्वाधिक ऑर्डर चिकन बिर्याणीची दिली. त्याननंतर मसाला डोसा, चिकन फ्राईस राइस, पनीर बटर मसाला, बटर नान, वेज फ्राईड राईस, वेज बिर्याणी आणि तंदूरी चिकन यांची ऑर्डरही मोठ्या प्रमाणात करण्यात आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी