अश्लिल व्हिडिओ व्हायरल, पत्रकारासह तिघांना अटक 

तामिळ टीव्ही चॅनलच्या एका रिपोर्टरसह तिघांना  चेंजिंग रूममध्ये महिला कपडे बदलत असतांनाचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

tamil tv channel reporter petrol pump police crime news in marathi
अश्लिल व्हिडिओ व्हायरल, पत्रकारासह तिघांना अटक   |  फोटो सौजन्य: Twitter

कोयंबतूर :  तामिळ टीव्ही चॅनलच्या एका रिपोर्टरसह तिघांना  चेंजिंग रूममध्ये महिला कपडे बदलत असतांनाचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

 या व्हिडिओमध्ये काही महिला पेट्रोल पंपावर कपड बदलून युनिफॉर्म परिधान करताना दिसत आहेत. पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या दोन व्यक्ती पेट्रोल पंपावर काम करत होते. 
 
 त्यांनी सांगितले की,  अटक केलेल्या पैकी एका व्यक्तीने महिलांच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेऊन महिला सहकाऱ्यांच्या कपडे बदलण्याचा व्हिडिओ तयार केला. पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी एका व्यक्तीची पत्नीही या व्हिडिओमध्ये आहे. 

तक्रारीनंतर तीन जणांना अटक केली

पोलिसांनी सांगितले की, महिलेने ड्रेसिंग रुममध्ये फोन पाहून आपल्या पत्नीला माहिती दिली. त्यानंतर त्याने व्हिडिओ डिलीट करून फोन तोडून दिला. पण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.  चौकशीत समोर आले की  फोडलेल्या फोनमधून आरोपींनी कसे तरी व्हिडिओ रिकव्हर केले आणि ते आरोपी पत्रकाराला पाठवले. त्यानंतर त्या रिपोर्टरने व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. तक्रारीनंतर तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी