Lalu Prasad Yadav Mimicry: लालू प्रसाद यादवांची ‘ही’ मिमिक्री पाहिली का? तेजप्रतापही झाले थक्क

सध्या बिहारमधील आठ वर्षांचा एक मुलगा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांचंही लक्ष त्याने आकर्षित केलं.

Lalu Prasad Yadav Mimicry
लालू प्रसाद यादवांची ‘ही’ मिमिक्री पाहिली का?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • तेजप्रताप यादवांनी शेअर केला व्हिडिओ
  • चिमुकल्याने केली लालू प्रसाद यादवांची मिमिक्री
  • व्हिडिओ होतोय व्हायरल

Lalu Prasad Yadav Mimicry: राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) हे भारतातील एक प्रसिद्ध व्यक्तीमत्त्व. देशातील अनेक मिमिक्री कलावंतांना (Mimicry artist) आकर्षित करणाऱ्या पात्रांपैकी लालूप्रसाद यादव हे एक नाव आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण त्यांची मिमिक्री करत असतात आणि त्यांच्या हटके शैलीत बोलण्याचा प्रयत्न करून लोकांना हसवत असतात. सध्या बिहारमधील आठ वर्षांचा एक मुलगा (8 year old) सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांचंही लक्ष त्याने आकर्षित केलं. आपल्या वडिलांची इतकी हुबेहूब नक्कल केल्याचं पाहून तेदेखील भारावून गेले. 

तेजप्रताप यांनी केली फर्माइश

लालूप्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. सतत काही ना काही पोस्ट टाकून किंवा व्हिडिओ टाकून ते जनतेच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. मंत्रिपदी विराजनमान झाल्यानंतरही त्यांनी आपला हा शिरस्ता कायम ठेवला आहे. सध्या तेजप्रताप यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांच्यासोबत एक आठ वर्षांचा मुलगा बसल्याचं दिसतं. तेजप्रताप त्याला आपल्या वडिलांची मिमिक्री करून दाखवण्याचं आवाहन करतात. त्यानंतर क्षणाचाही वेळ न दवडता हा मुलगा आपल्या खास शैलीत मिमिक्री करायला सुरुवात करतो. 

भन्नाट मिमिक्री

लालू प्रसाद यांचे प्रसिद्ध डायलॉग या मुलाने त्याच्या मिमिक्रीसाठी निवडले आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या बोलण्याची लकब, आवाजातील चढउतार, पॉज घेण्याची स्टाईल, एखाद्या विशिष्ट शब्दावर जास्त भर देण्याची त्याची शैली यासारखे बारकावे या मुलानं बरोबर टिपल्याचं लक्षात येतं. वयानुसार त्याचा आवाज कोवळा असला तरी इतर बाबतीत त्याने हुबेहूब लालू प्रसाद यादव यांची मिमिक्री केल्याचं पाहून तेजप्रतापही खूश होतात आणि त्याच्या या कलेचं त्यांना जाम कौतुक वाटतं. 

अधिक वाचा - Optical Illusion: या ऑप्टिकल इल्युजनमध्ये टोमॅटोमध्ये लपले आहेत सफरचंद...10 सेकंदात शोधून दाखवा

तेजप्रताप गेले भारावून

आपल्या बिहारमध्ये इतके गुणी कलावंत आहेत, हे पाहून भारावून गेल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अशा कलावंतांच्या आपण नेहमीच पाठिशी राहू आणि त्यांना प्रोत्साहन देत राहू, असं त्यांनी म्हटलं आहे. अनेक दिग्गज कलावंत या चिमुकल्याची मिमिक्री पाहून थक्क होतील, असं त्यांनी म्हटलं आहे. मिमिक्री करणाऱ्या मुलाचं नाव अंश मिश्रा असं असून तो आठ वर्षांचा आहे. इतक्या कमी वयात त्याने मिळवलेलं मिमिक्री कऱण्याचं कौशल्य हे त्याच्या अफाट निरीक्षणशक्तीचं द्योतक असल्याचं मानलं जात आहे. 

अधिक वाचा - बापरे..., एकाच्या पोटातून बाहेर आले 63 चमचे, डॉक्टरही आश्चर्यचकित

व्हिडिओ होतोय व्हायरल

लालू प्रसाद यादव यांच्या मिमिक्रीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आतापर्यंत 60 हजारपेक्षाही अधिक लोकांनी तो पाहिला असून त्यावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी