VIDEO: धक्कादायक! पावसात अचानक झाडावर पडली भयानक वीज; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद

Shocking Video । सध्या पावसाचा हंगाम सुरू झाला आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाला सुरूवात देखील झाली आहे.

Terrible lightning suddenly fell on the tree in the rain, shocking incident captured in camera
पावसात अचानक झाडावर पडली भयानक वीज, पाहा धक्कादायक व्हिडीओ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या पावसाचा हंगाम सुरू झाला आहे.
  • पावसात अचानक झाडावर पडली भयानक वीज.
  • धक्कादायक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद.

Shocking Video । मुंबई : सध्या पावसाचा हंगाम सुरू झाला आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाला सुरूवात देखील झाली आहे. दरम्यान पावसाळ्याच्या दिवसात आकाशात विजांचा लखलखाट आपण सर्वांनीच ऐकला असेल. वीज पडली की अनेकजण घाबरतात. तर काही लोक सावध होतात आणि ते बाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी मुसळधार पावसात लोक अथवा शेतकरी पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली जाऊन उभे राहतात. झाडाच्या मदतीने ते पावसापासून स्वतःचा बचाव करतात. पण आज आपण अशा एका व्हिडीओ बद्दल भाष्य करणार आहोत जो पाहून तुम्हीही पावसात झाडाखाली थांबताना दहावेळा विचार कराल. (Terrible lightning suddenly fell on the tree in the rain, shocking incident captured in camera). 

अधिक वाचा : पेन्शन धारकांचे पंतप्रधान मोदींना रक्ताच्या ठशांचे निवेदन

धक्कादायक व्हिडीओ व्हायरल 

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल की, वीज पडल्यावर झाडाखाली थांबणे किती धक्कादायक आणि घातक आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पावसाळ्याच्या दिवसांचा आहे, ज्यामध्ये पावसाळ्यात विजांचा कडकडाट ऐकू येतो. या दरम्यान झाडावर विजांचा कडकडाट होत आहे. 

क्षणातच विजेने केले तांडव

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डोळ्याच्या क्षणातच वीज पडल्यानंतर होणारा विद्युत प्रवाह पाहून लोकांचे डोळे पाणावले आहेत. यादरम्यान कारमध्ये बसलेले लोक व्हिडीओ बनवत होते, ज्यांच्या किंकाळ्या तुम्हाला सहज ऐकू येतील. सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांना धक्काच बसला आहे.  

व्हायरल व्हिडीओमध्ये असे पाहायला मिळते की, कारमध्ये बसलेले लोक व्हिडीओ बनवत होते, तेव्हा अचानक आकाशातून वीज कोसळते आणि एका झाडावर पडते. आकाशातून पडणारी वीड किती धोकादायक आहे हे तुम्ही दृश्यात पाहू शकता. त्या वेळी कोणी झाडाखाली असते तर नक्कीच त्याचा जीव गेला असता. wonderofscience नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी