Viral Video: टेस्ला कार अनियंत्रित; रस्त्यावरील कार, बाईकला दिली जोरदार धडक, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Tesla Car uncontrolled: टेस्ला कार अनियंत्रित झाली आणि समोर येणाऱ्या सर्व गाड्यांना जोरदार धडक दिल्याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अंगावर अक्षरश: काटा येतो.

tesla car uncontrol hits vehicles people in china video goes viral watch it
Viral Video: टेस्ला कार अनियंत्रित; रस्त्यावरील कार, बाईकला दिली जोरदार धडक, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ 

Tesla Car accident: टेस्ला कार अनियंत्रित झाली आणि त्यानंतर एक भीषण अपघात झाला आहे. हा अपघात चीनमधील गुआंगडोंग येथे झाला आहे. 5 नोव्हेंबर रोजी झालेल्या या अपघातात एक बाईकस्वार आणि एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला आहे. टेस्ला कार अनियंत्रित झाल्यानंतर जो अपघात झाला आहे त्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून जोरदारव व्हायरल होत आहे. (tesla car uncontrol hits vehicles people in china video goes viral watch it)

अ‍ॅलन मस्क यांच्या मालकीची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाने रविवारी म्हटलं, या अपघातामागचं सत्य जाणून घेण्यासाठी एक थर्ड पार्टी एजन्सीची मदत घेतली जात आहे. आम्ही आवश्यक ती सर्व मदत करणार आहोत.

टेस्ला कंपनीसाठी चीन दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. रविवारी टेस्ला कारच्या अपघाताचा व्हिडिओ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टॉप ट्रेंडिंगमध्ये होता. टेस्लाने म्हटलं, व्हिडिओवरुन दिसून येतं की, कार खूपच वेगाने जात होती, कारची ब्रेक लाईट चालत नव्हती आणि संपूर्ण प्रवासात कारने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केलेला नाही.

जिमू न्यूज ने वाहतूक पोलिसांच्या हवाल्याने म्हटलं की, चाओझोऊ शहरात झालेल्या अपघाताचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. ड्रायव्हरच्या कुटुंबियांपैकी एका सदस्याने सांगितले की, 55 वर्षीय ड्रायव्हरने जेव्हा कार एका स्टोअर समोर थांबवण्यात येत होती तेव्हा कार कारच्या ब्रेक पॅडलमध्ये काही बिघाड झाला आणि गडबड झाली.

हे पण वाचा : राजकीय नेते फॉर्च्युनर गाडीचा सर्वाधिक वापर का करतात?

टेस्ला मॉडेल वाय इलेक्ट्रिक कार अनियंत्रित होऊन झालेल्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ही घटना चीनमधील गुआंगडोंग येथील दक्षिण प्रांतात घडली होती. रिपोर्ट्सनुसार, ड्रायवर गाडी पार्क करत असताना टेस्ला कार मॉडेलमध्ये काही बिघाड झाला आणि त्यानंतर हा अपघात घडला. ही घटना 5 नोव्हेंबर रोजीची आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी