No Bridges on Amazon River | 9 देशांतून वाहणाऱ्या अमेझॉन नदीची खासियत, हजारो किलोमीटर मार्गात नाही एकही पूल, माहित आहे का कारण?

Amazon River Stories |  नदीवर पूल बांधणं, हे काही रॉकेट सायन्स नाही. मात्र तब्बल 9 देशांतून वाहणाऱ्या अमेझॉन नदीवर एकही पूल नाही. यामागचं कारण फारच इंटरेस्टिंग आहे.

No Bridges on Amazon River | 
या नदीवर एकही पूल नाही  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जगातील महाकाय अमेझॉन नदीच्या मार्गात एकही पूल नाही
  • नदीसोबत वाहून येतो लाखो लिटर गाळ
  • पुलाशिवायही सुखात राहतात 9 देशातले नागरिक

No Bridges on Amazon River |  जगातील सर्वाधिक लांबीच्या (6400 km) आणि अवाढव्य पात्र (Humongous) असणाऱ्या नद्यांपैकी एक नदी म्हणजे अमेझॉन. (Amazon River) तब्बल 9 देशांतून (9 countries) वाहणाऱ्या आणि जवळपास 6400 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या नदीवर एकही पूल (Not a single bridge) नाही. यामागचं कारण विचार करायला लावणारं आहे. स्ट्रक्चरल इंजिनिअर्सनी यामागच्या कारणांचा शोध घेतला आणि काही तथ्यं समोर आली. 

एकही पूल नाही

कुठल्याही छोट्या मोठ्या नदीवर किंवा ओढ्यावरही पूल बांधल्याचं आपण नेहमी पाहतो. जलाशयाच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाण्यासाठी या पुलांचा वापर करण्यात येतो. मात्र जगातील अवाढव्य नद्यांपैकी एक असणाऱ्या अमेझॉन नदीवर मात्र असा एकही पूल नाही. स्वीस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, झ्युरिचमध्ये कार्यरत असणारे स्ट्रक्चरल इंजिनिअर वॉल्टर कफमॅन (Walter Kaufmann) यांनी यामागच्या काही महत्त्वाच्या कारणांचा शोध घेतला. Live Science नावाच्या संस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यातील काही कारणांचा खुलासा केला आहे. 

विरळ वस्ती

अमेझॉन नदी ज्या ज्या भूभागातून वाहते, तो प्रदेश विरळ लोकसंख्या असणारा आहे. या भागात पूल बांधून जोडण्याजोगे रस्तेच नाहीत. ज्या ज्या मोठ्या शहरांमधून ही नदी वाहते, त्या ठिकाणी वाहतुकीची उत्तम व्यवस्था आहे. नदीच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे जाण्यासाठी सध्याची वाहतूक व्यवस्था सक्षम आणि पुरेशी आहे. त्यामुळे नदीवर पूल बांधण्याची गरज निर्माण झालेली नाही. 

गरजच नसल्याने मागणी नाही

अमेझॉन नदी ज्या प्रदेशातून वाहते, त्यापैकी कुठल्याही भागातील नागरिकांनी नदीवर पूल बांधण्याची मागणी केलेली नाही. कारण नागरिकांना तशी गरजच वाटत नाही. गरज नाही म्हणून पूल नाहीत, असं साधंसोपं समीकरण यामागे असल्याचं इंजिनिअर सांगतात. 

पूल बांधण्यातील तांत्रिक अडथळे

अमेझॉन नदीच्या स्वरुपाचा विचार केला, तर नदीवर पूल बांधण्यात अनेक तांत्रिक अडथळे आणि आव्हानं आहेत. असे पूल बांधण्यासाठी मोठ्या आर्थिक गुंतवणुकीचीही गरज आहे. मात्र आवश्यकता नसल्याने अशी गुंतवणूक करण्यासाठी कुणीच पुढे येत नाही. नदीतील पाण्याच्या वेगामुळे मोठ्या प्रमाणात गाळ वाहून नेला जातो. त्यामुळे नदीमार्गातील बहुतांश ठिकाणची नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर गाळ साचलेला असतो. तिथली रेती मऊ असल्यामुळे पुलासाठी आवश्यक फाउंडेशन तयार करणे, हे मोठे आव्हान मानले जाते. 

आव्हानात्मक हवामान

अमेझॉन नदी ज्या भागातून वाहते तिथलं हवामान हे टोकाचं आणि सतत बदलणारं असतं. काही ठिकाणी पाणी उथळ तर काही ठिकाणी खोल आहे. अर्थात, या सगळ्या बाबींचा विचार करता नदीवर बांधकाम करणं अशक्य आहे, असं नाही. मात्र पुलाशिवायच सर्व कारभार सुरळीत सुरू असल्यामुळे पूल बांधण्याची आजवर गरजच निर्माण झालेली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी