'या' बागेतून उघडते मृत्यूचे दार, बागेत गेलेला माणूस जीवंत परतत नाही

The Alnwick Poison Garden, world most poisonous garden, where if you breathe you will get up from the world : जगात चित्रविचित्र अशी अनेक ठिकाणं आहेत. यातलेच एक ठिकाण आहे इंग्लंडमध्ये आहे.

The Alnwick Poison Garden
'या' बागेतून उघडते मृत्यूचे दार 
थोडं पण कामाचं
  • 'या' बागेतून उघडते मृत्यूचे दार, बागेत गेलेला माणूस जीवंत परतत नाही
  • इंग्लंडमध्ये आहे हे ठिकाण
  • द अलनविक पॉयझन गार्डन हे आहे ठिकाणाचे नाव

The Alnwick Poison Garden, world most poisonous garden, where if you breathe you will get up from the world : जगात चित्रविचित्र अशी अनेक ठिकाणं आहेत. यातलेच एक ठिकाण आहे इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंडमध्ये नॉर्थम्बरलँड येथे 'द अलनविक पॉयझन गार्डन' नावाची बाग आहे. ही बाग 'विषारी बाग' म्हणून प्रसिद्ध आहे. या बागेत गेलेला माणूस जीवंत राहात नाही, असे म्हणतात. 

'द अलनविक पॉयझन गार्डन' नावाच्या बागेत अनेक सुंदर झाडे आहेत. पाने-फुले आहेत. कारंजांमुळे बागेची शोभा आणखी वाढत आहे. पण या बागेत कोणीही जात नाही. बागेत गेलेला माणूस परत येत नाही असे सांगतात. याच कारणामुळे बागेत कोणी जीवंत माणूस जाण्याचे धाडस करत नाही. 

चीनमध्ये मेंढ्या रहस्यमरित्या गोल गोल फिरतात

वयाच्या 86 व्या वर्षी बॉडी बिल्डिंग

अशी चर्चा आहे की, 'द अलनविक पॉयझन गार्डन' नावाच्या बागेत जीवंत व्यक्तीने श्वास घेतला तर त्याच्या शरीरात विषद्रव्ये जातात. या विषामुळेच माणसाचा मृत्यू होतो असे सांगतात. 'द अलनविक पॉयझन गार्डन' या बागेला जगातील सर्वात धोकादायक बाग म्हणतात.

इंग्लंडमध्ये राजेशाही पद्धतीने कारभार सुरू असताना एक विषारी झाडांची बाग विकसित करण्यात आली. या सुमारे 14 एकर भूखंडावर पसरलेल्या बागेत 700 प्रकारची विषाची झाडे लावण्यात आली. बागेतील विविध झाडांची पाने-फुले-फळे आणि खोड यांच्यापासून विष तयार करून काही जणांची हत्या करण्यात आली होती. 

बागेत आजही विष निर्मिती करणारी 700 झाडे आहेत. याच कारणामुळे विषारी बागेत जर कोणाला जायचे असेल तर सोबत बागेच्या सुरक्षा रक्षकाला घेऊन जावे लागते. बागेत कोणत्याही झाडाला हात लावण्यास अथवा बागेतून पान, फुल, फळ, खोड, रोपटे असे काहीही बाहेर नेण्यास सक्त मनाई आहे. बागेतील फुलांचा वास घेण्यास मनाई आहे.

'द अलनविक पॉयझन गार्डन' या बागेसाठी लोखंडाचे मोठे प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे. दरवाजारुपी लोखंडी गेटवर बागेतील धोक्याविषयी स्पष्ट शब्दात नमूद केले आहे. धोका नमूद असूनही काही जणांनी बागेत जाऊन चुका केल्या. यामुळे विषारी बागेत 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.  

विषारी बागेत खबरदारी घेऊन झाडांची निगा राखली जाते. बागेचे माळी कापणी करून झाडांना विविध आकर्षक आकार देतात. बागेचे सौंदर्य जपतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी