Viral News In Marathi | नवी दिल्ली : सोशल मीडियावर नेहमी काही ना काही गोष्टी व्हायरल होत असतात. दरम्यान कॉमिक बुक आर्ट ही चित्रणाच्या जगात सर्वाधिक मागणी असलेली एक नोकरी आहे. मात्र जगभारातील लाखो लोकांसाठी हा एक आवडता मनोरंजनाचा छंद देखील आहे. मोठमोठ्या व्यावसायिकांना आणि सेलिब्रेटींना अनेकदा सुपरहिरो, कार्टून कॅरेक्टर्स झटपट पेन किंवा पेन्सिल स्केचेस बनवावे लागतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कलाकार एकाचवेळी पाच पेन्सिलच्या साहाय्याने चित्र रेखाटत आहे. (The artist draws with 5 pencils a picture at a time, Watch the video).
अधिक वाचा : ही ५ पाने चावल्याने झपाट्याने कमी होईल वजन
दरम्यान, वेग आणि अचूकतेसह त्यांची छोटीशी ही चित्रकला सर्वांना आकर्षित करत आहे. कलाकाराने एकाच वेळी अनेक चित्र रेखाटलेली पाहून सर्वचजण चक्रावून गेले आहेत. तुम्ही अनेकवेळा अनेकांना एकाच वेळी दोन काम करताना पाहिले असेल, मात्र इथे काहीसे वेगळेच आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक कलाकार एकाच वेळी पाच सुपरहिरोचे स्केच तयार करताना दिसत आहे. तेही फक्त दोन हातांच्या मदतीने.
ट्विटरवरील युजर ब्रायन रोमेले (@BrianRoemmele) या युजरने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक अज्ञात कलाकार एका आडव्या रॉडला पाच पेन जोडून एकाचवेळी पाच पेनांच्या साहाय्याने चित्र काढत आहे.
लक्षणीय बाब म्हणजे या व्हिडीओमध्ये कलाकाराने फक्त एका हाताचा वापर केला आहे आणि जस्टिस लीगच्या सदस्यांची - सुपरमॅन, बॅटमॅन, वंडर वुमन, एक्वामॅन आणि द फ्लॅश यांची अचूक स्केच बनवली आहेत.
काही युजर्संनी या कलाकाराचे तोंडभरून कौतुक करत कमेंट केल्या आहेत. एकाने लिहले की, "या कलाकाची कला पाहून मला वाटते की माझ्याकडे कोणतेच टॅलेंट आणि कला नाही याची मला जाणीव होत आहे." तर दुसऱ्या युजरने म्हटले की, "या कलाकाराची कला पाहून मी खूप भारावून गेलो आहे."