Viral Video: आरारा खतरनाक! भररस्त्यात आपोआप चालू लागली रिक्शा; नंतर स्वत:च झाली पार्क 

Shocking Video । सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ असे असतात की त्यावर विश्वास ठेवणेही कठीण जाते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये एक रिक्षा स्वतःहून धावू लागते.

The auto rickshaw started automatically see unique video
भररस्त्यात आपोआप चालू लागली रिक्शा, नंतर स्वत:च झाली पार्क   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.
  • भररस्त्यात आपोआप चालू लागली रिक्शा, नंतर स्वत:च झाली पार्क.
  • रिक्शाच्या या अनोख्या व्हिडीओ नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

Shocking Video । मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातील काही व्हिडीओ असे असतात की त्यावर विश्वास ठेवणेही कठीण जाते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये एक रिक्षा स्वतःहून धावू लागते. व्हिडीओ पाहणाऱ्यांना याच्यावर विश्वासच बसत नाही. एवढेच नाही तर काही लोक या व्हिडीओवर अनेक भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. त्यात 'भूत' आल्याचे काहीजण म्हणत आहेत, तर काही जण 'चमत्कार' झाल्याचे सांगत आहेत. (The auto rickshaw started automatically see unique video). 

अधिक वाचा : ENG आणि NZ च्या खेळाडूंनी वॉर्नला वाहिली अनोखी श्रद्धांजली

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, वादळाच्या दरम्यान वाहने रस्त्यावरून सतत ये-जा करत आहेत. काही वेळाने रस्त्यावर असे दृश्य पाहायला मिळते, जे पाहून लोक थक्क होतात. एक रिक्षा स्वतःहून रस्त्यावरून चक्कर मारून येते. सुरुवातीला लोकांना समजत नाही की नक्की हे काय प्रकरण आहे? परंतु बारकाईने पाहिल्यावर रिक्षा स्वतःच चालत असल्याचे दिसून येते. एवढेच नाही तर त्या रिक्षावर कोणी बसलेलेही नाही. काही वेळाने रिक्षाही आपोआप उभी होते. खर तर ही रिक्षा वाऱ्याच्या झोक्याने हालचाल करत असते. 

इथे पाहा व्हिडीओ

वाऱ्यामुळे रिक्क्षा एकाजागेवरून निघल्याबरोबरच तेथील काही लोकांनी रिक्शाच्या चालकाला आवाज देऊन सावध करण्याचा प्रयत्न केला. मात्र रिक्शा वाऱ्याची शुळूक संपताच आपल्या जागी येऊन उभी राहिली. 

धक्कादायक व्हिडीओ व्हायरल 

हा व्हिडीओ पाहताच क्षणी तुम्हालाही धक्का बसला असेल. तुमच्याही मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. हे धक्कादायक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्विटरवर '@LSoccerworld' नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आता लोक या व्हिडीओवर आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी